Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abroad Trip: परदेशात जाण्यापूर्वी ‘या’ चुका करणं तुम्हाला महागात पडू शकतं

परदेशात जाण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं असत. तुम्ही जर पहिल्यांदाच परदेशात प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची कागदपत्रं. पॅकिंग करताना उत्साहाच्या भरात नवीन कपडे, फोटोग्राफीसाठी कॅमेरा, स्किन केअर बॉक्स या सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत. पण काही लोक त्यांची महत्त्वाची कागदपत्रे ठेवायला विसरतात. तुम्ही चुकुनही ही चूक करू नका.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 22, 2024 | 02:21 PM
फोटो सौजन्य -iStock

फोटो सौजन्य -iStock

Follow Us
Close
Follow Us:

परदेशात जाण्याचं नाव ऐकताचं लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. परदेशात शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा स्थायिक होण्यासाठी जाणं खूप मोठी गोष्ट असते. परदेशात जाणं अनेकांचं स्पप्न असतं. परदेशात जाताना केला जाणार विमान प्रवास एक वेगळाच आनंद घेऊन येतो. पण आनंदाच्या भरात आपल्याकडून होणाऱ्या चूका आपल्याला प्रचंड महागात पडू शकतात. परदेशात जाण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं असत.

हेदेखील वाचा – भारतीय रेल्वेकडून सुवर्णसंधी! कमी बजेटमध्ये घ्या हिमाचलच्या निसर्गमय सौंदर्याचा अनुभव

तुम्ही जर पहिल्यांदाच परदेशात प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची कागदपत्रं. परदेशात जायंच असेल तर आपण भरपूर शॉपिंग करतो. कपडे, कॅमेरा, बॅग, शूज आणि बरंच काही. पॅकिंग करताना उत्साहाच्या भरात नवीन कपडे, फोटोग्राफीसाठी कॅमेरा, स्किन केअर बॉक्स या सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत. पण काही लोक त्यांची महत्त्वाची कागदपत्रे ठेवायला विसरतात. तुम्ही चुकुनही ही चूक करू नका. परदेशात प्रवास करताना आपला पासपोर्ट, व्हिसा आणि आपली कागदपत्रं अत्यंत महत्त्वाची असतात. त्यामुळे नवीन कपडे, फोटोग्राफीसाठी कॅमेरा, स्किन केअर बॉक्स या गोष्टी पॅक करण्यापूर्वी सर्वात आधी तुमची महत्त्वाची कागदपत्रं घ्या.

परदेशात जाण्यापूर्वी एक आठवडा आधीच, तुमचे फ्लाइट तिकीट, हॉटेल बुकींग आणि इतर गोष्टी पुन्हा एकदा तपासा, कारण तिथे पोहोचल्यानंतर ह्या गोष्टी तुमच्यासाठी त्रासाचे कारण बनू शकते. जर तुम्ही कंपनीच्या कामानिमित्त परदेशात जात असाल तर आधी लॅपटॉप, चार्जर, कागदपत्रे यासारख्या वस्तू बॅगेत ठेवा. याशिवाय जागा बदलल्याने काही लोक आजारी पडतात. त्यामुळे मेडिकल बॉक्स जपून ठेवा. जर तुम्ही स्थायिक होण्याच्या उद्देशाने परदेशात जात असाल तर तुम्ही तुमच्या पासपोर्टची वैधता तपासली पाहिजे. याशिवाय आवश्यक व्हिसा आणि परवानग्या मिळवा. तुम्ही तुमची सर्व बिले, कर्ज, क्रेडिट कार्ड वेळेवर तपासून पहा. परदेशात जाण्यापूर्वी, आपण चलन बदलणे आवश्यक आहे.

हेदेखील वाचा – ‘हज यात्रे’साठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

परदेशात जाणार म्हणजे विमान प्रवास आलाच. पण विमानातून प्रवास करताना काही गोष्टी नेण्यास मनाई असते, अशा गोष्टी तुमच्या सामानात सापडल्या तर तुमची परदेशवारी धोक्यात येऊ शकते. विमानातून प्रवास करताना तुमच्या कॅरी ऑन लगेजमधून तुम्ही 100 मिलीपेक्षा जास्त लिक्विड घेऊन जाऊ शकत नाही. याचं कारण काही विशिष्ट लिक्विड एकत्र करून हानिकारक केमिकल्स तयार करण्याचा धोका असतो. विमानातून प्रवास करताना प्रवाशांना कोणतीही धारदार वस्तू सामानातून नेण्यास मनाई आहे. त्यामुळे नेलकटर, चाकू, लोखंडी वस्तू, हत्यारे, रेझर, सुई अशी कोणतेही वस्तू प्रवासी त्यांच्या सामानातून घेऊ जाऊ शकत नाही. तसेच तुम्ही तुमच्या सामानातून बेसबॉल, बॅट, धनुष्यबाण, क्रिकेट बॅट, गोल्फ क्लब्स, बॉकी स्टिक्स, दोरी, स्पिअर गन्स अशा कोणत्याही वस्तू घेऊन जाऊ शकत नाही. तुमच्या सामानात यामधील कोणतीही वस्तू आढळल्यास तुमची परदेशवारी धोक्यात येऊ शकते.

Web Title: Abroad trip making these mistakes before going abroad can cost you dearly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 02:12 PM

Topics:  

  • Abroad Trip

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.