इस्लाम धर्मात हज रात्रेला फार महत्त्व आहे. सौदी अरेबियातील मक्कामध्ये दरवर्षी ही इस्लामिक तीर्थयात्रा असते. इस्लाममधील धार्मिक मान्यतेनुसार, जे लोक आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात त्यांना एकदा तरी हज यात्रा करणे बंधनकारक असते. या हज रात्रेला जाण्यासाठी सर्वप्रथम आपली नोंदनी करावी लागते. तुम्हीही हज यात्रा करण्याचा विचार केला असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे.
आज आम्ही तुम्हाला हज यात्रेसाठी नोंदणी कशी करावी याची सविस्तर माहिती सांगणार आहोत. साधारण कोणत्याही परदेशी हज यात्रेकरूकडे पासपोर्ट आणि हेल्थ सर्टिफिकेट असणे गरजेचे असते. तसेच या यात्रेला जाण्यासाठी व्यक्तीचे वय 12 वर्षांपेक्षा अधिक असणे अनिवार्य आहे. हज आणि उमराह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हज यात्रेला जाणाऱ्या व्यक्तीकडे नुसुक (Nusuk) ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून हज परमिट असणे आवश्यक आहे. त्याशिवाय हज यात्रेला जाणे बेकायदेशीर ठरेल.
हेदेखील वाचा – भारतीय रेल्वेकडून सुवर्णसंधी! कमी बजेटमध्ये घ्या हिमाचलच्या निसर्गमय सौंदर्याचा अनुभव