भारतातील अनेक ठिकाण आहे नजीसर्गाने समृद्ध आहेत. या ठिकाणी जाऊन मनःशांती मिळते. हिमाचल प्रदेशदेखी यातीलच एक आहे. हिमाचल प्रदेश हे उत्तर भारतातील एक पहाडी राज्य आहे. हा एक बर्फाच्छादित प्रदेश आहे. इथले सौंदर्य स्वर्गाहून कमी नाही. अनेकांचं हिमाचलला जाण्याचं स्वप्न असत, तुम्हीही यातीलच असाल तर आता तुम्हाला भारतीय रेल्वेकडून एक सुवर्णसंधी प्राप्त होत आहे. जोडीदाराची साथ आणि निसर्गमय वातावरण याहून अधिक काय हवं… जाणून घ्या या पॅकेजबद्दल सविस्तर.
भारतीय रेल्वेच्या IRCTC ने भारतीय प्रवाशांसाठी फिरण्यासाठीची एक उत्तम संधी आणली आहे. ज्यामध्ये तुम्ही हिमाचल प्रदेशच्या दोन सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. हे दोन ठिकाण आहेत, डलहौसी आणि मॅक्लॉडगंज. विशेष म्हणजे अगदी कमी बजेटमध्ये तुम्हाला या ठिकाणांना भेट देता येणार आहे. ही ट्रिप एकूण 8 दिवसांची असेल यात तुम्हाला राहण्यापासून ते जेवणापर्यंत अनेक सोई-सुविधा उपलब्ध होतील. IRCTC ने नुकतीच आपल्या सोशल मीडियावर टूर पॅकेजची माहिती शेअर केली आहे. जर तुम्ही आपल्या कुटुंबासोबत सहलीचे नियोजन करण्याचा विचार करत असाल तर हा टूर पॅकेज तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
हेदेखील वाचा – श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी एकाच राज्यातील या दोन ज्योतिर्लिंगांना नक्की भेट द्या! 2 दिवसांतच यात्रा पूर्ण होईल
या टूर पॅकेजचे बुकिंग करण्यासाठी तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. इथे तुम्हाला पॅकेज संबंधित सविस्तर माहिती उपलब्ध होईल.