तुम्ही भारतातील लंडन कधी पाहिले आहे का? इथे अवघ्या 5000 रुपयांत लुटता येतो Honeymoon चा आनंद
सध्या लग्नांचा सीजन सुरु आहे. जर तुमचे नवीन लग्न झाले असेल किंवा या सिजनमध्ये तुम्ही लग्न करण्याचा विचार केला असेल तर तुम्ही हनिमून डेस्टिनेशनच्या नक्कीच शोधात असाल. जगभरात अनेक हनिमून डेस्टिनेशन्स आहेत, परंतु ही डेस्टिनेशन्स जितकी सुंदर आहेत तितकीच ती महाग देखील आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही कमी पैशात हनिमून साजरा करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक सुंदर डेस्टिनेशन घेऊन आलो आहे, जिथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत जवळपास 5000 रुपयांमध्ये हनिमून साजरा करू शकता. स्वस्तात मस्त अशा या ठिकाणाविषयी चला सविस्तर जाणून घेऊयात.
कोणते आहे हे ठिकाण?
हनिमूनसाठी आपण ज्या डेस्टिनेशनबद्दल बोलत आहोत ते झारखंडची राजधानी रांचीपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेले मॅक्क्लुस्कीगंज (McCluskeyganj) आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे ठिकाण एक छोटेसे पहाडी शहर आहे, जे खूप सुंदर आहे. नैसर्गिक सौंदर्यासोबतच येथे तुम्हाला ब्रिटीशकालीन जुने वाडे, टेकड्या आणि नद्या पाहायला मिळतील.
झारखंडचे लंडन
मॅक्क्लस्कीगंज हे झारखंडचे मिनी लंडन म्हणूनही ओळखले जाते. हे ठिकाण लंडनसारखे महागडे नसले तरी येथे फिरण्यासारखे आणि पाहण्यासाठी बरेच काही आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, मॅक्क्लस्कीगंजची वास्तुकला अतिशय सुंदर आहे आणि तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर हे ठिकाण तुम्हाला अजिबात निराश करणार नाही. येथे तुम्हाला सुंदर जंगल आणि 4 ते 5 सुंदर नद्या पाहायला मिळतील. जे पाहून तुम्ही हिमाचल आणि उत्तराखंडचे हिल स्टेशन विसराल.
कितीला मिळेल इथे एक रूम?
जर तुम्ही हनिमूनला एका सुंदर ठिकाणी जाण्याचा विचार केला असेल आणि तुमचेही बजेटही जर कमी असेल तर मॅक्क्लुस्कीगंज तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. इथे तुम्हाला तुमच्या बजेटनुसार रूम्स मिळतील. खोलीची किंमत सुमारे 1000 रुपयांपासून सुरू होते. जर तुम्ही ऑनलाइन बुकिंग केले तर तुम्हाला चांगली सूट मिळू शकते. यासोबतच खाण्या-पिण्याचेही इथे अनेक पर्याय उपलब्ध असतील, जे फारसे महाग नाहीत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार चाललात तर इथे तुमची सुमारे 5000 रुपयांमध्ये 2 ते 3 दिवसांची सहल पूर्ण होऊ शकते.
इथे येऊन घेता येतो सनसेटचा आनंद
जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत कॉलीटी टाईम घालवायचा असेल, तर तुम्ही रांचीपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या पत्राटू व्हॅलीमध्ये जाऊ शकता. ज्याला झारखंडचे मनाली असेही म्हटले जाते. हे एक ऑफबीट डेस्टिनेशन आहे जिथे तुम्हाला कमी गर्दी दिसेल आणि तुम्हाला येथे भेट देण्याचे अनेक पर्याय देखील मिळतील. जर तुम्हा दोघांना ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. यासोबतच आम्ही तुम्हाला सांगतो की इथल्या टेकड्यांवरून खूप सुंदर सनसेटचे दृश्ये पाहता येते, जे पाहून तुम्ही आणि तुमचा जोडीदार मंत्रमुग्ध व्हाल. इथे येऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक सुंदर, शांत आणि मोकळा वेळ घालवू शकता , जो शेवटपर्यंत तुमच्या लक्षात राहील.
कसे पोहचाल मॅक्क्लुस्कीगंज?
मॅक्क्लुस्कीगंज जाण्याचा सर्वात उत्तम आणि सोपा मार्ग रांचीहून लोहगड येथून आहे. जर तुम्ही ट्रेनने इथे जाण्याचा विचार केला असेल तर आमही तुम्हाला सांगतो की, हावडा येथून अनेक नियमित ट्रेन धावतात. जर तुम्ही फ्लाइटने येत असाल, तर मॅक्क्लुस्कीगंजचे सर्वात जवळचे विमानतळ रांची (IXR) विमानतळ आहे जे 53.2 किमी अंतरावर आहे. यासोबतच रस्त्यानेही मॅक्क्लस्कीगंजलाही जाता येते. यासाठी रांचीहून, तुम्ही मॅक्क्लुस्कीगंजला जाण्यासाठी बस घेऊ शकता किंवा कार भाड्याने घेऊ शकता. रांची ते मॅक्क्लस्कीगंज पर्यंत ड्रायव्हिंग करण्याचा अनुभव खूप छान असेल कारण या काळात तुम्ही सुंदर घनदाट जंगले आणि पठारी भागातून जाल.