Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॅरीस, मालदीव नाही तर हनिमूनसाठी हे डेस्टिनेशन्स ठरतायंत खास, निसर्गाच्या सानिध्यात घेता येतो रोमँटिक वातावरणाचा अनुभव

लग्नानंतर खास हनिमूनसाठी ग्रीस, आइसलँड, हवाई आणि बहामास ही देश रोमँटिक वातावरण, सुंदर समुद्रकिनारे आणि अविस्मरणीय अनुभव देणारी उत्तम आंतरराष्ट्रीय ठिकाणे ठरू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 28, 2026 | 08:35 AM
पॅरीस, मालदीव नाही तर हनिमूनसाठी हे डेस्टिनेशन्स ठरतायंत खास, निसर्गाच्या सानिध्यात घेता येतो रोमँटिक वातावरणाचा अनुभव

पॅरीस, मालदीव नाही तर हनिमूनसाठी हे डेस्टिनेशन्स ठरतायंत खास, निसर्गाच्या सानिध्यात घेता येतो रोमँटिक वातावरणाचा अनुभव

Follow Us
Follow Us:
  • लग्नाचा सीजन जवळ आलाय.
  • तेच तेच ठिकाण नाही तर नवीन ठिकाणी घ्या हनिमूनचा आनंद.
  • निसर्गाच्या सानिध्यात पार्टनरसोबत वेळ घालवायचा तर ही ठिकाणे नक्कीच जाणून घ्या.
जर तुमची लवकरच लग्नाची तारीख ठरली असेल, तर हनिमूनसाठी परदेशात कुठे जावे याचा विचार नक्कीच सुरू झाला असेल. अनेकांना वाटते की पॅरिस किंवा मालदीव हेच सर्वात लोकप्रिय पर्याय आहेत, पण जगात अशीही काही देश आहेत जे पर्यटनाच्या बाबतीत झपाट्याने प्रगती करत आहेत आणि नवविवाहित जोडप्यांसाठी उत्तम ठरत आहेत. चला तर जाणून घेऊया अशा काही खास डेस्टिनेशन्सबद्दल.

या हॉटेलमध्ये झालंय रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच लग्न, इथलं एक दिवसाचं भाडं म्हणजे संपूर्ण महिनाभराचा पगार…

 ग्रीस

दक्षिण युरोपमध्ये वसलेला ग्रीस हा इतिहास, निसर्गसौंदर्य आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील स्वच्छ निळेशार पाणी, रम्य सनराईज आणि चविष्ट भूमध्य आहार हनिमूनसाठी परिपूर्ण वातावरण तयार करतात. येथे तुम्ही Acropolis of Athens, Temple of Apollo, Meteora तसेच Old Town of Corfu यांसारखी जागतिक कीर्तीची स्थळे पाहू शकता. ग्रीसची नाईटलाइफही तितकीच आकर्षक असून, पार्टनरसह क्वालिटी टाइम घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

आइसलँड

जर तुम्हाला स्वर्गासारखा अनुभव देणारे ठिकाण हवे असेल, तर आइसलँड हा उत्तम पर्याय आहे. बर्फाच्छादित पर्वत, धबधबे आणि शांत वातावरण यामुळे येथे एक वेगळाच रोमँटिक माहोल तयार होतो.
येथील सर्वात खास आकर्षण म्हणजे Aurora Borealis. आकाशात हिरवा, गुलाबी आणि जांभळ्या रंगांची उधळण पाहणे हा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरतो.

 हवाई

नवविवाहितांसाठी हवाई आयलंड्स म्हणजे शांतता, रोमँस आणि निसर्ग यांचा सुंदर संगम. येथील स्वच्छ समुद्रकिनारे, हिरवीगार जंगले आणि आल्हाददायक वातावरण तुमचा हनिमून खास बनवतात.
येथे तुम्हाला सक्रिय ज्वालामुखी जवळून पाहण्याची संधी मिळते. समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताचा आनंद घेताना जोडप्यांना अविस्मरणीय क्षण अनुभवता येतात.

 बहामास

जर तुम्ही हनिमूनसाठी थोडा मोठा बजेट ठेवला असेल, तर बहामास हा आलिशान पर्याय ठरू शकतो. कॅरिबियन समुद्रातील हा देश आपल्या सुंदर बीचेस आणि रिसॉर्ट्ससाठी ओळखला जातो.
येथे तुम्ही Harbour Island, Pig Beach आणि Paradise Island यांसारखी ठिकाणे पाहू शकता. सनबाथ, वॉटर अ‍ॅक्टिव्हिटीज आणि प्रायव्हेट रिसॉर्ट्समुळे हा अनुभव अधिक खास ठरतो.

द्रविड वास्तुकलेने समृद्ध, समुद्रकिनारी उभे असलेले भारताचे प्राचीन मंदिर; 8 व्या शतकात केली उभारणी…

 परदेश प्रवासापूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

  • पासपोर्ट आणि व्हिसा आधीच तयार ठेवा.
  • प्रवासापूर्वी त्या देशाची सविस्तर माहिती आणि हवामान तपासा.
  • चलन बदलून घेण्याची तयारी करा.
  • ट्रॅव्हल इन्शुरन्स घेणेही फायद्याचे ठरते.
  • योग्य नियोजन आणि योग्य डेस्टिनेशनची निवड केल्यास तुमचा हनिमून आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव ठरू शकतो.

Web Title: World best honeymoon destination plan your trip travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • honeymoon destintions
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Travel Name : दिल्लीतील जंतर मंतर का आहे खास? येथील 4 स्तंभांचे रहस्य जाणून घ्या
1

Travel Name : दिल्लीतील जंतर मंतर का आहे खास? येथील 4 स्तंभांचे रहस्य जाणून घ्या

Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा
2

Sapt Badri Yatra : तुम्ही पाहिले आहेत का उत्तराखंडमधील सप्तबद्री? अशी प्लॅन करा यात्रा

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या
3

Travel News : दोन लोकांच्या बाली ट्रिपसाठी किती खर्च येईल? ट्रिपचा खर्च आणि सर्व तपशील जाणून घ्या

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या
4

रेल्वेत शाही सफर हवीये? मग सलून कोच तुमच्यासाठी ठरेल परफेक्ट, कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.