Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel: दिल्लीचा तो मिनार जिथे टांगली जायची चोरांची मुंडकी, 800 वर्षे जुना इतिहास, जाणून घ्या सविस्तर

दिल्लीतील हा भयावह मिनार तुम्ही कधी पाहिला आहे का? या मिनारावर पूर्वीच्या काळी हत्या केलेल्या चोरांची मुंडकी टांगली जायची. या मिनाराचा इतिहास 800 वर्षे जुना असून या जागेतील अनेक गोष्टी थक्क करून टाकणाऱ्या आहेत. या जागेचा इतिहास आणि इथे कसे जायचे याविषयी सविस्तर जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 17, 2024 | 01:02 PM
चोरमिनार

चोरमिनार

Follow Us
Close
Follow Us:

पूर्वी भारतावर अनेक शासकांनी राज्य केले. या राज्यकर्त्यांनी त्याकाळी उंच उंच इमारती बांधल्या, ज्या आज भारताच्या अनेक ऐतिहासिक वास्तूंमध्ये समाविष्ट आहेत. अनेक इमारती तर अशा अद्भुत प्रकारे बांधल्या आहेत की त्यांना पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक भारतात येत असतात. दिल्ली एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला अनेक सुंदर किल्ले, थडगे, मशिदी आणि उंच मिनार पाहायला मिळतील.

जर आपण मिनारांविषयी बोलणे केले तर दिल्लीतील कुतुबमिनार अनेकांनी प्रत्यक्षात किंवा फोटोत पाहिला असेल. अनेकदा पाहिला असेल, परंतु तुम्हाला माहिती आहे का की राजधानीत एक मिनार देखील आहे ज्याला ‘चोर मिनार’ म्हणून ओळखले जातो. याच्या नावावरूनच या जागेचे गूढ लक्षात येते. असे म्हणतात की हे ठिकाण चोरांशी संबंधित आहे, ज्यांचे डोके येथे लटकवले जायचे. हे ऐकल्यावरच तुम्ही या जागी जाण्याचा विचार करत असाल, मात्र त्याआधी या ठिकाणाचा इतिहास जाणून घ्या.

कोणी बांधला होता चोरमिनार

दिल्लीतील हौज खास भागातील औरंगजेब रोडवर चोर मिनार आहे. असे मानले जाते की, हा मिनार 12 व्या शतकात बांधला गेला होता आणि त्याच्या बांधकामाचे संपूर्ण श्रेय अलाउद्दीन खिलजीला जाते, जो खिलजी घराण्याशी संबंधित होता.

225 छिद्रे असलेल्या मिनारवर टांगल्या जायच्या मुंडक्या

या मिनारमध्ये 225 छिद्रे असून, अलाउद्दीन खिलजीच्या कारकिर्दीत चोरी आणि दरोडेखोरांना मारल्यानंतर त्यांची मुंडकी या छिद्रांतून लटकवली जात असल्याचे सांगितले जाते. अलाउद्दीनच्या विरोधात कोणीही बंड करू नये आणि सर्वांनी त्याच्याशी भयभीत राहावे म्हणून असे केले जायचे. त्याच वेळी, जर डोक्याची संख्या छिद्रांपेक्षा जास्त असेल तर कमी महत्त्वाच्या मृत लोकांची डोकी मिनाराच्या बाहेर पिरॅमिडवर ठेवली जायची.

हेदेखील वाचा – Raksha Bandhan 2024: फक्त रक्षाबंधनाच्या दिवशीच ‘या’ मंदिराचे दार उघडतात, 364 दिवस मंदिर असते बंद

मिनाराला या नावानेही ओळखले जाते?

चोरमिनार व्यतिरिक्त या मिनाराला ऑफ बीहेडिंग आणि चोरांचा मिनार या नावानेही ओळखले जाते. असे मानतात की, अलाउद्दीनने आपल्या राजवटीत अनेक मंगोलियांची हत्या केली होती. ज्यांचे डोके कापून टॉवरच्या छिद्रातून टांगण्यात आले होते. असे म्हटले जाते की, मंगोलियाच्या आक्रमणकर्त्यांमुळे अलाउद्दीनच्या सैन्याला खूप लढावे लागले आणि अनेक वेळा त्यांनी अलाउद्दीनच्या हल्ल्यांना खडतर आव्हान देखील दिले.

कसे जायचे?

हा मिनार पाहण्यासाठी तुम्ही हौज खास स्टेशनवर पोहोचू शकता आणि तेथून ऑटो करू शकता. या ठिकाणी भेट देण्याची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 अशी आहे, त्यामुळे या काळातच तुम्ही या मिनाराला भेट देऊ शकता.

 

Web Title: Delhi famous minar where thieves get punished by hanging their heads

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 12:58 PM

Topics:  

  • delhi

संबंधित बातम्या

LPG Gas Cylinder झाले स्वस्त, सलग पाचव्या महिन्यात सिलेंडर स्वस्त झाला, आजपासून नवे दर लागू
1

LPG Gas Cylinder झाले स्वस्त, सलग पाचव्या महिन्यात सिलेंडर स्वस्त झाला, आजपासून नवे दर लागू

परराज्यात जाऊन काम करण्याची संधी! असा करा अर्ज, DPCC स्पेशल भरती!
2

परराज्यात जाऊन काम करण्याची संधी! असा करा अर्ज, DPCC स्पेशल भरती!

RSS Chief Mohan Bhagwat: प्रत्येक भारतीयाने ३ अपत्ये जन्माला घालावीत! मोहन भागवत यांचे विधान चर्चेत
3

RSS Chief Mohan Bhagwat: प्रत्येक भारतीयाने ३ अपत्ये जन्माला घालावीत! मोहन भागवत यांचे विधान चर्चेत

NARI-2025 Report: महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित शहर कोणते? NARI च्या अहवालातून धक्कादायक खुलासे
4

NARI-2025 Report: महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित शहर कोणते? NARI च्या अहवालातून धक्कादायक खुलासे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.