Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हायवेवर गाडी चालवताना पेट्रोल संपलं की फ्रीमध्ये मिळते ‘ही’ सर्व्हिस, कुणालाही माहिती नाही ही गोष्ट

महामार्गावरून प्रवास करणे सोपे नाही. गाडीचे पेट्रोल अचानक संपले किंवा अपघात झाला तर एनएचएआयकडून प्रवाशांना काही मोफत सुविधा दिल्या जातात. प्रवाशांचा प्रवास सुलभ आणि आरामदायी करण्यासाठी या सुविधा पुरवल्या जातात. नक्की कोणकोणत्या सुविधा प्रवाशांना दिल्या जातात आणि यांचा लाभ कसा घ्यायचा याविषयी जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 22, 2024 | 09:17 AM
हायवेवर गाडी चालवताना पेट्रोल संपलं की फ्रीमध्ये मिळते 'ही' सुविधा, कुणालाही माहिती नाही ही गोष्ट

हायवेवर गाडी चालवताना पेट्रोल संपलं की फ्रीमध्ये मिळते 'ही' सुविधा, कुणालाही माहिती नाही ही गोष्ट

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी महामार्गाचा मार्ग अवलंबवतअसतात. हा लांब आणि रुंद रस्ता वाहन चालवण्यासाठी तर उत्तम आहेच, पण ट्रॅफिक जाम टाळण्यासाठीही हा एक चांगला पर्याय आहे. मात्र, महामार्गावर वाहन चालवणे सोपे नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. महामार्ग अनेकदा शहराबाहेर असल्याने कोणत्याही प्रकारच्या घटनेच्या वेळी लोकांना मदत मिळणे कठीण होऊन बसते.

विशेषत: हायवेवर गाडी चालवताना पेट्रोल संपलं की काय करायचं याचं टेन्शन लोकांना पडतं. मात्र चिंता करून नका, कारण आज आम्ही तुम्हाला हायवेवर गाडी बंद पडल्यास कोणत्या सुविधा दिल्या जातात याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत. या सुविधा NHAI कडून हायवेवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला मोफत दिल्या जातात. म्हणजेच या सुविधांसाठी तुम्हाला कोणताही एक्सट्रा चार्ज भरावा लागणार नाही.

हेदेखील वाचा – प्रभू रामाने जिथे केले दशरथांचे पिंडदान! भारतातील ‘ही’ ठिकाणं आहेत श्राद्ध-पिंड दानासाठी प्रसिद्ध, इथे पूर्वजांना मिळतो मोक्ष

हायेवर पेट्रोल संपल्यास करा हे काम

हायवेवर गाडी चालवताना तुमचे पेट्रोल संपले तर तुम्हाला घाबरण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही शेवटचा कोणता टोल प्लाझा ओलांडला फक्त हे लक्षात ठेवा. टोल स्लिपच्या तळाशी आपत्कालीन क्रमांक दिला जातो. तुम्ही या नंबरवर ताबडतोब कॉल केल्यास 15 मिनिटांत तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, विशेष म्हणजे तुम्हाला या सर्व्हिससाठी कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागत नाही. याशिवाय 1033 वर कॉल करून तुम्ही 5 ते 10 लिटर पेट्रोलची ऑर्डर देऊ शकता. सेवेसाठी कोणतेही शुल्क नाही, परंतु तुमच्याकडून पेट्रोलची किंमत मात्र आकारली जाईल.

नॅशनल महामार्गावर मिळते राहण्याची सुविधा

हायवेवर सतत गाडी चालवताना थकवा आला तर रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यावर तुम्ही आराम करू शकता. यासाठी तुम्हाला कोणीही नकार देणार नाही आणि कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय पाणी आणि शौचालयाची सुविधाही तुम्ही मोफत घेऊ शकता.

हेदेखील वाचा – जिथे पांडवांची सर्व पापं नष्ट झाली, भारतातील प्राचीन शिवमंदिर, रंजक आख्यायिका, ऑक्टोबरमध्ये करा प्लॅन!

गाडी खराब झाल्यावर करू शकता हे काम

प्रवासादरम्यान तुम्ही गाडी खराब झाली तर काळजी करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीतही तुम्ही 1033 क्रमांकावर कॉल करून मेकॅनिक आणि क्रेनला कॉल करू शकता. मेकॅनिकला कॉल करण्याची सुविधा मोफत आहे. पण गाडी दुरुस्त करण्यासाठी त्याला काही पैसे द्यावे लागतात. समस्येचे त्वरित निराकरण करणे शक्य नसल्यास, वाहन क्रेनद्वारे उचलले जाते आणि जवळच्या सेवा केंद्रात नेले जाते.

इमरजेंसी फोन बूथ सुविधा

काही वेळा नॅशनल महामार्गावर मोबाईल सिग्नल मिळत नाही. अशा परिस्थितीत अनेकवेळा एखाद्याला कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. तुम्ही कधीही आपत्कालीन परिस्थितीत अडकल्यास, तुम्ही टोलपर्यंत पोहोचू शकता आणि आपत्कालीन टोल बूथचा वापर करू शकता.

मेडिकल इमरजेंसीसाठी मिळते ऍम्ब्युलन्स

नॅशनल महामार्गावर तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या लोकांचे आरोग्य बिघडल्यास किंवा वैद्यकीय परिस्थितीती उद्भवल्यास, तुम्ही वैद्यकीय आपत्कालीन फोन नंबरवर कॉल करू शकता. NHAI द्वारे प्रदान केलेले ऍम्ब्युलन्स क्रमांक 8577051000 आणि 7237999911 आहेत. यांचा वापर करून काही क्षणातच घटनास्थळी ऍम्ब्युलन्स बोलावू शकता. या क्रमांकांवर कॉल करताच 10 मिनिटांत ऍम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचते. किरकोळ वैद्यकीय गरज भासल्यास ते त्वरित केले जाते, अन्यथा ऍम्ब्युलन्स तुम्हाला जवळच्या रुग्णालयात घेऊन जाते. ऍम्ब्युलन्स सुविधादेखील तुम्हाला मोफत दिली जाते.

प्रवासादरम्यान आपल्याला तणावाचा सामना करावा लागू नये यासाठी सर्व टोलनाक्यांवर ऍम्ब्युलन्स , रिकव्हरी गाडी आणि सुरक्षा पथके ठेवण्यात आली आहेत. सर्वसाधारणपणे लोकांना याची माहिती नसते. परंतु प्रवाशांचा प्रवास सुलभ आणि आरामदायी करण्यासाठी या सुविधा पुरवल्या जातात.

Web Title: If you run out of petrol while driving on the highway you get these free facilities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 09:16 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.