दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अनेक लोक कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त घरापासून दूर बाहेरगावी राहत असतात. अशात या दिवाळीच्या सणानिमित्त अनेकजण सुट्टीत आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतात. यासाठी मुख्यतो लोक भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) प्रवासाला अधिक पसंती देतात. कारण हा एकमेव वेगवान आणि स्वस्त प्रवास आहे. सध्या वंदे भारत ट्रेनची फार चर्चा आहे.
काही वर्षांपूर्वीच या ट्रेनला सुरु करण्यात आलं आणि तेव्हापासून सर्वांनाच या ट्रेनमधून अनेकांना प्रवास करण्याची इच्छा आहे. आता सणासुदीच्या काळात ट्रेनचं तिकीट मिळणं थोडं कठीणच असत. अशात अनेकांना प्रश्न पडतो की, वंदे भारत ट्रेनमध्ये ‘वेटिंग तिकीट’ घेऊन प्रवास करता येईल का? याच प्रश्नाचे उत्तर आज तुम्हाला या लेखातून जाणून घेता येणार आहे. चला तर मग याविषयी काय नियम आहेत ते जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – आता रेल्वे तिकिटासाठी 120 दिवसांआधी रिझर्वेशन करता येणार नाही, बुकिंग प्रणालीमधील नवीन बदल जाणून घ्या
‘वेटिंग तिकीट’ने वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करता येईल?
आता याच्या नियमबद्दल बोलायचे झाले तर जर तुम्हाला ट्रेनमध्ये चांगली सुविधा मिळत असेल तर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल. जर तुमचे तिकीट वेटिंगमध्ये असेल तर याचा अर्थ ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे सीट नाही. वेटिंग लिस्टमध्ये नाव असलेल्या कोणत्याही प्रवाशाला ट्रेनमध्ये सीट नंबर दिला जात नाही.
तुम्ही वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करत असाल किंवा इतर कोणत्याही ट्रेनमध्ये, वेटिंग लिस्ट केलेले तिकीट घेऊन प्रवास करणे रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते. याचे कारण म्हणजे, एखादा प्रवासी जर वेटिंग लिस्टमध्ये असेल तर त्याला त्याच्या तिकिटाचे पैसे परत मिळतात. अशा परिस्थितीत तुम्ही प्रवास करत असाल तर याचा अर्थ असा आहे की, तुम्ही कोणत्याही सीटशिवाय प्रवास करत आहात. त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून हे नियम करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवास करताना तुम्हाला वेटिंग तिकिटताच नियम माहिती असायला हवा.
हेदेखील वाचा – विचित्र परंपरा! इथली लोक मृतदेहांच्या हाडांपासून सूप बनवून पितात, कारण ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हाथ
वेटिंग तिकीट घेऊन प्रवास केले तर काय होईल?
जर तुम्ही वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करत असाल तर यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. तुम्हाला पकडले गेल्यास तुम्हाला पुढील स्टेशनवर देखील उतरवण्यात येऊ शकतं. TTE तुमच्याकडून 500 रुपये दंड आकारू शकतात. जर तुम्ही वेटिंग तिकीट घेऊन लांबचा प्रवास केला असेल तर तुमच्याकडून जास्तीचा दंड आकाराला जाऊ शकतो.