या देशांमध्ये अवघ्या 20 हजार रुपयांत करता येते विदेश यात्रा! लगेच तयारीला लागा
प्रत्येकाचे परदेशात जाण्याचे स्वप्न असते. मात्र अनेकदा बजेटअभावी लोक निराश होऊन बसतात. विशेषतः भारतातील लोक जे बहुतांशी मध्यमवर्गीय आहेत. मात्र तुम्हाला माहित आहे का? की तुम्ही कमी बजेटमध्येही तुम्ही विदेश यात्रेचा आनंद लुटू शकता. काही विशिष्ट देशांमध्ये परदेशात जाण्याचे तुमचे स्वप्न कमी बजेटमध्ये पूर्ण होऊ शकते. होय. नवनवीन ठिकाणी फिरणे, तेथील संस्कृती जाणून घेणे, नवीन चव चाखणे यातून एक वेगळा अनुभव मिळत असतो. त्यामुळे आपल्या बीजी शेडट्यूलमधून वेळ काढा आणि नवनवीन देशांना भेट द्या.
जर तुम्ही 2025 मध्ये परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तेही कमी बजेटमध्ये, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये प्रवास करू शकता. यासोबतच तुमचे परदेश प्रवासाचे स्वप्नही पूर्ण होईल. चला तर मग जाणून घेऊया त्या देशांबद्दल सविस्तर.
हेदेखील वाचा – भारतातील सर्वात महागड्या हॉटेलमध्ये थांबले होते Donald Trump, एका रात्रीचे भाडे आणि सुविधा पाहून धक्काच बसेल
थायलँड
थायलँड भारतीयांसाठी बजेट अनुकूल असू शकते. भारतीय पर्यटकांना येथील सुंदर समुद्रकिनारे, मंदिरे, रंजक नाइटलाइफ आणि जेवण आवडते. येथे एका व्यक्तीचा साप्ताहिक खर्च 35,000 ते 50,000 रुपयांपर्यंत असू शकतो. यामध्ये फ्लाइट, निवास, भोजन आणि प्रवास यांचा समावेश आहे. इथे तुम्ही बैंकॉक, पटाया, फुकेट, चियांग माई, क्राबी अशा काही लोकप्रिय ठिकाणांना भेट देऊ शकता. इथल्या खाद्यपदार्थांविषयी बोलणं केलं तर तुम्ही, खाओ सोई, थाई करी, पपाया सलाद, मांगो स्टिकी राइस, मासमान करी या पदार्थांची चव चाखू शकता.
नेपाळ
भारतीयांसाठी नेपाळ हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. येथे जाण्यासाठी व्हिसा आणि पासपोर्टची आवश्यकता नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय चलनही येथे फिरते. हिमालयाच्या सुंदर दऱ्या, काठमांडूचा प्राचीन वारसा आणि पोखरा तलाव पर्यटकांना आकर्षित करतात. नेपाळमधील सर्व प्रमुख पर्यटन स्थळांना 20,000 ते 50,000 रुपयांच्या बजेटमध्ये सहज भेट दिली जाऊ शकते. नेपाळमध्ये अंकोर वाट, फोनो पेन्ह, ताओल स्लेंग म्यूजियम, कम्पोट, बांस द्वीप ही भेट देण्यासाठीची लोकप्रिय ठिकाणे आहेत. इथे तुम्ही कुय टेव, अमोक, सी फूड, चिकन, खमेर नूडल्स अशा पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
भूतान
‘लँड ऑफ द थंडर ड्रॅगन’ म्हणून ओळखला जाणारा भूतान पूर्व हिमालयाच्या पर्वतीय प्रदेशात आणि दक्षिण आशियाई प्रदेशातील सर्वात स्वच्छ देशांपैकी एक आहे. भूतान हा मठ, पारंपारिक वास्तुकला, सुंदर दऱ्या, बर्फाच्छादित पर्वतीय दृश्ये आणि हिरवाईने नटलेला देश आहे. तुम्ही 30,000-40,000 रुपयांच्या खर्चात तुमचा संपूर्ण प्रवास पूर्ण करू शकता. इथे तुम्हाला एम्मा दत्शी, शकम पा, मोमोज अशा काही लोकप्रिय पदार्थांचा आस्वाद घेता येईल.
हेदेखील वाचा – या भारतीय पदार्थाची Kamala Harris आहे फॅन, न्यूयॉर्कमध्ये राहून या ठिकाणी लुटू शकता पदार्थाची चव
इंडोनेशिया
जर तुम्ही निसर्ग प्रेमी असाल तर बाली तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही कमी खर्चात आलिशान रिसॉर्ट्स, समुद्रकिनारे आणि नैसर्गिक ठिकाणांचा आनंद घ्याल. येथील खाद्यपदार्थही बऱ्याच प्रमाणात स्वस्त आहेत. तुम्ही येथे साहसाचा आनंदही घेऊ शकता. एका आठवड्याच्या इंडोनेशिया सहलीसाठी 40 ते 60 हजार रुपये खर्च येतो. इंडोनेशियामध्ये बाली, कोमोडो द्वीप, जकार्ता, योवजाकार्ता, लॉम्बोक ही ठिकाणे फार लोकप्रिय आहेत. तसेच इथे गेल्यावर सी फूड, माई, अयम तंदूरी, कारी कम्बिंग, क्यू पुटु या पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.
टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.