भारताच्या या ठिकाणी घ्या मालदीवचा आनंद! 2 लाख रुपयांत नाही तर फक्त 20000 रुपयांमध्ये हनिमून होईल संस्मरणीय
भारतात अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, ज्यांना तुम्ही भेट देऊ शकता. आज मात्र आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका ठिकाणाविषयी सांगत आहोत, जिथे तुम्ही स्वस्तात मालदीवचा आनंद अनुभवू शकता. मालदीव हे एक फेमस इंटरनॅशनल पर्यटनस्थळ आहे, अशात इथे जायचे असेल तर लाखो रुपये खर्च करावे लागतील अशात कमी बजेटमध्ये जर तुम्हाला तुमच्या सुट्टीचा किंवा हनिमूनचा क्षण संस्मरणीय करायचा असेल तर तुम्ही उत्तराखंडातील एका ठिकाणाला भेट देऊ शकता.
उत्तराखंडमध्ये अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत, जे पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येथे येत असतात. इथे टिहरी जिल्ह्यात मालदीवसारखे सुंदर पर्यटनस्थळ आहे. ज्याला मिनी मालदीव म्हटले जाते. खऱ्या अर्थाने हे ठिकाण मिनी मालदीवपेक्षा कमी नाही आणि मिनी मालदीव या नावाने हे ठिकाण आता पर्यटकांच्या मनावर राज्य करत आहे.
भारतात अशी काही गावांची नावे आहेत जी सांगताना लोकांना वाटते लाज, कल्पनाही करू शकणार नाही
भारतातील मिनी मालदीव
इथे टिहरी तलावात तरंगणाऱ्या झोपड्यांना मिनी मालदीव म्हणतात. तलावावर बांधलेल्या या झोपड्या मालदीवच्या वॉटर व्हिलाप्रमाणेच तरंगतात. यामुळेच या ठिकाणाला मालदीव म्हणून संबोधले जाते. या झोपड्यांमध्ये तुम्ही पाण्याच्या वर असलेल्या तलावात राहून तलावाच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. जर तुम्ही हनिमूनचा प्लान करत असाल किंवा मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम आहे. येथे तुम्ही निसर्गाच्या सौंदर्याचा तसेच तलावात तरंगणाऱ्या झोपड्यांचा आनंद घेऊ शकता. या झोपड्यांमध्ये राहण्यासाठी तुम्हाला 20 हजार रुपये मोजावे लागतील.
स्वस्तात घेऊ शकता मालदीपचा फील
लाखो रुपये खर्च करून समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी लोक मालदीवमध्ये जातात. मालदीवचे समुद्रकिनारे जगभर प्रसिद्ध आहेत. येथे फिरण्यासाठी लोक 2 ते 3 लाख रुपये खर्च करतात. जर तुम्हाला उत्तराखंडमधील मालदीवची अनुभूती घ्यायची असेल, तर टिहरी तलाव तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे आणि येथे तुमचे लाखोंचे काम हजारोंमध्ये होईल.
टिहरी तलाव
तलावांच्या मधोमध वसलेल्या टिहरीच्या मिनी मालदीवमध्ये तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेऊ शकता. टिहरी तलावात पर्यटक बोटिंग, जेट स्कीइंग, कयाकिंग आणि इतर जलक्रीडा उपक्रमांचा आनंद घेऊ शकतात. तुम्ही एकदा टिहरी तलावाला भेट द्या आणि येथे तरंगत्या झोपड्यांमध्ये राहण्याचा आणि वाॅटर स्पोर्ट्स एक्टिविटीजचा आनंद घ्या.