900 वर्षांहून अधिक जुने भारतातील एक रहस्यमयी शिवलिंग
आपला भारत देशाला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. देशात तुम्हाला अनेक मंदिरे आणि धार्मिक वस्तू पाहायला मिळतील. प्रत्येक मंदिराची आपली अशी वेगळी कथा आणि रंजक गोष्टी असतात. भगवान शंकराचे तर अनेक चमत्कारी मंदिर देशात पाहायला मिळतात. ही मंदिरं रहस्याने भरलेली असतात. आम्ही तुम्हाला ज्या मंदिराविषयी सांगत आहोत त्याचा इतिहास फार जुना आहे आणि मुख्य म्हणजे येथील शिवलिंगाचा रंग दिवसातून तीन वेळा बदलतो. आज आपण या मंदिराच्या काही रहस्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
लवकरच श्रावण महिना सुरु होणार आहे. हा महिना भगवान शंकराला समर्पित केला जातो. या रहस्यमयी शंकरच्या मंदिरात श्रावणाच्या पहिल्या सोमवारी मोठ्या जत्रेचे आयोजन केले जाते. हे मंदिर आग्रामध्ये स्थित आहे. वास्तविक पाहता हे मंदिर जवळपास जवळपास 900 वर्षांहून अधिक जुने आहे. या मंदिराचे नाव राजेश्वर महादेव मंदिर असे आहे. लोकांच्या श्रद्धेशी निगडीत या मंदिरात अनेक रहस्ये दडलेली आहेत. यातीलच एक म्हणजे, या मंदिरात बसवण्यात आलेले शिवलिंग दिवसातून तीन वेळा रंग बदलते. राजेश्वर महादेव मंदिरात असलेले शिवलिंग स्वयंप्रतिष्ठापित आहे, जे प्रत्येक भक्ताच्या मनोकामना पूर्ण करते, असे मानले जाते.
हेदेखील वाचा – भारतातील ‘या’ ठिकाणी आहे मानवाच्या हाडांची भरलेला तलाव! रहस्याने भरपूर 1000 वर्षांहूनही जुना आहे इतिहास
मंदिर ट्रस्टचे उपसचिव यांनी सांगितले की, भारतपूरचा राजा खेडा या गावातील एका सावकाराने हे मंदिर बांधले. या मंदिरात बसवण्यात आलेल्या शिवलिंगाच्या स्थापनेसाठी हा सावकार मध्य प्रदेशात गेला आणि त्यांनी नर्मदा नदीतून बैलगाडीत शिवलिंग आणले. सावकार इथे आला तेव्हा इथे मंदिराजवळ एक विहीर होती. रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी लोक इथे थांबत असे. सर्वकारही त्यावेळी आपल्या साथीदारांसह याठिकाणी विश्रांतीसाठी थांबला. यावेळीच भगवान शिव सावकाराच्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितले की, माझ्या शिवलिंगाची याजगी स्थापना कर. मात्र सावकार या गोष्टीला राजी नव्हता.
यानंतर तो शिवलिंग घेऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागला. यावेळी बैलगाडीत या बैलगाडीला दोन बैल जोडले होते, कामगार हिला ढकलत होते. मात्र तरीही बैलगाडी अजिबात हलली नाही. त्यानंतर या गाडीला आणखीन दोन बैल जोडण्यात आली मात्र तरीही काही फरक पडला नाही आणि ही बैलगाडी जशीच्या तशी त्या जागेला खिळून राहिली. यावेळी सावकाराला शिवलिंगही हलवता आले नाही, परिणामी सावकाराने अखेर त्याजागी या शिवलिंगाची स्थापना केली. यानंतर हा सावकार या जागेतून निघून गेला.
पूर्वीसारखीच आजही या मंदिरावर अनेकांची श्रद्धा आहे. श्रावणातील सोमवारी तर याठिकाणी भाविकांची भारीच गर्दी पाहायला मिळते. येथे वर्षभर भाविक पूजेसाठी येत असतात. या ठिकाणी आल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची मान्यता आहे. इथे आल्याने प्रत्येक समस्येवर उपाय मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.