Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रद्धेचा चमत्कार! जंगलाचा शिकारी झाला भक्त, शंकराच्या चरणी केलं नतमस्तक अन् अद्भुत Video Viral

Tiger Viral Video : भक्तीसमोर शक्तीही नतमस्तक होते...! जंगलाचा धोकादायक शिकारी वाघ शंकराच्या भेटीला आला. पिंडीसमोर जाताच त्याने नतमस्तक केले आणि दृष्य पाहून युजर्स अवाक् झाले.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 22, 2026 | 02:32 PM
श्रद्धेचा चमत्कार! जंगलाचा शिकारी झाला भक्त, शंकराच्या चरणी केलं नतमस्तक अन् अद्भुत Video Viral

श्रद्धेचा चमत्कार! जंगलाचा शिकारी झाला भक्त, शंकराच्या चरणी केलं नतमस्तक अन् अद्भुत Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • वाघ शंकराच्या पिंडीजवळ नतमस्तक झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
  • व्हिडिओ व्हायरल होताच लोकांमध्ये श्रद्धा आणि चमत्कार यांवर चर्चा सुरु झाली.
  • जंगलाचा धोकादायक शिकारी देवाच्या चरणी लीन झाल्याचे दृश्य पाहून यूजर्स थक्क झाले.
श्रद्धेपायी लोक वाटेल ते करायला तयार होतात. माणूस प्रगत झाला पण त्याच्या मनातील श्रद्धेची भावना आजही कायम आहे. आपण आजवर माणसांची श्रद्धा पाहिली असेल पण तुम्ही कधी जंगलाच्या प्राण्याला देवा चरणी लीन होताना कधी पाहिलं आहे का? हे अनोखे दृष्य अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे ज्यात जंगलाचा शिकारी भगवान शंकराच्या पिंडीजवळ नतमस्तक होताना दिसून आला. जंगलाचा धोकादायक शिकारी शंकराच्या पिंडीला नतमस्तक होत आहे हे पाहून यूजर्स अवाक् झाले आणि सर्वांनी व्हिडिओ वेगाने शेअर करायला सरुवात केली. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

62 व्या वाढदिवशी आजोबांनी फिल्मी अंदाजात आज्जीला केलं प्रपोज, गोंडस दृश्यांनी जिंकलं युजर्सचं मन; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

हा व्हायरल व्हिडिओ मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. धीमरखेडा तहसील अंतर्गत सदरच्या घनदाट जंगलात पाहिलेल्या दृश्यावर लोकांना विश्वास ठेवणे कठीण जात आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, बरेच जण याला निसर्गाचा चमत्कार म्हणत आहेत, तर काही जण याला श्रद्धेचा चमत्कार म्हणत आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की ही सामान्य घटना नाही, तर भगवान शिवाची कृपा आणि चमत्कार आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर यात एक वाघ शंकराच्या पिंडिवर आपले डोकं टेकवताना दिसून येतो. जंगलाचा शिकारी शंकराच्या पिंडीचरणी आपले डोते टेकवत आहे हे पाहून यूजर्स थक्क झाले आहेत.

हा व्हायरल व्हिडिओ @last24hrofindia नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला आशा आहे की ते एआयने बनवले नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वाघाने असे काहीतरी करणे थोडेसे असामान्य आहे..” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काही क्षण स्पष्टीकरणाच्या पलीकडे जातात. श्रद्धा आणि निसर्ग मिळून खरोखरच शक्तिशाली काहीतरी निर्माण करतात”.

Surprising scenes from MP Forest !! Tiger bowed its head before a sacred Shivling of Lord Shiva in MP’s Sadar Forest 🚩 pic.twitter.com/wmcpFpFd0Z — News Algebra (@NewsAlgebraIND) February 21, 2026

लग्नघरातच अंधार! वरात निघताच नवऱ्या मुलाच्या समोर लाइटमॅनने कापली इलेक्ट्रीसिटी, Video Viral

तथापि, व्हिडिओच्या दुसऱ्या बाजूविषयी बोलणं केलं तर वन विभाग आणि वन्यजीव तज्ञांचे म्हणणे आहे की वाघांमध्ये डोके घासणे ही एक सामान्य सवय आहे. ते त्यांच्या गालावर आणि कपाळावर असलेल्या सुगंधी ग्रंथींचा वापर करून प्रदेश चिन्हांकित करण्यासाठी झाडांवर, दगडांवर किंवा इतर पृष्ठभागावर डोके घासतात. प्रादेशिक वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी किंवा खाज सुटण्यासाठी हे वर्तन वापरले जाते. वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की हे धार्मिक श्रद्धेशी संबंधित नाही, तर वाघांसाठी एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. शिवाय, हे ठिकाण गावापासून फक्त ४०० मीटर अंतरावर असल्याने, त्यांनी स्थानिक रहिवाशांना सतर्क राहण्याचा आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्याचा सल्ला दिला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral miracle of faith tiger bows in front of shivling viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Shivlinga
  • tiger
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘कारमध्ये बसलो म्हणून आम्ही श्रीमंत का?’ ; चिमुरडीचा लीचीच्या भावावरुन विक्रेत्याशी गोड वाद, VIDEO पाहून नेटकरीही फिदा
1

‘कारमध्ये बसलो म्हणून आम्ही श्रीमंत का?’ ; चिमुरडीचा लीचीच्या भावावरुन विक्रेत्याशी गोड वाद, VIDEO पाहून नेटकरीही फिदा

धक्कादायक! घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेला गुंडांनी काठ्यांनी केली मारहाण, रक्तरंजित झाले शरीर अन् घटनेचे सीसीटिव्ही फुटेज Viral
2

धक्कादायक! घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेला गुंडांनी काठ्यांनी केली मारहाण, रक्तरंजित झाले शरीर अन् घटनेचे सीसीटिव्ही फुटेज Viral

हवेत अडकलेल्या 300 पर्यटकांसाठी जवान ठरले देवदूत! जीव धोक्यात घालून केलं थरारक रेस्क्यू; Video Viral
3

हवेत अडकलेल्या 300 पर्यटकांसाठी जवान ठरले देवदूत! जीव धोक्यात घालून केलं थरारक रेस्क्यू; Video Viral

VIRAL : अरे हे काय…भारताच्या नकाशातून चक्क जम्मू-काश्मीर गायब; BCCI च्या एका चुकीमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट
4

VIRAL : अरे हे काय…भारताच्या नकाशातून चक्क जम्मू-काश्मीर गायब; BCCI च्या एका चुकीमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.