Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ही आहेत भारतातील सर्वाधिक भेट दिलेली पर्यटन स्थळे! प्रवास प्रेमींनी एकदा नक्की भेट द्या

प्रवासाची आवड असणारे लोक नेहमीच कोणत्या ना कोणत्या नवीन ठिकाणाच्या शोधात असतात. भारत जगभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. परंतु भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे पर्यटक सर्वाधिक भेट देतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 23, 2024 | 09:37 AM
ही आहेत भारतातील सर्वाधिक भेट दिलेली पर्यटन स्थळे! प्रवास प्रेमींनी एकदा नक्की भेट द्या

ही आहेत भारतातील सर्वाधिक भेट दिलेली पर्यटन स्थळे! प्रवास प्रेमींनी एकदा नक्की भेट द्या

Follow Us
Close
Follow Us:

भारत हा विविधतेने भरलेला सुंदर देश आहे. आपल्या देशात असे अनेक गोष्टी आहेत ज्या पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक भारतात येत असतात. यात काही सुंदर ठिकाणे देखील आहे. यामुळेच भारत जगभरात प्रसिद्ध आहे आणि सर्वांचे आवडते पर्यटन स्थळ देखील आहे. प्रत्येक राज्यातील प्रत्येक शहराची स्वतःची अशी काही खासियत असते. परंतु अशी काही ठिकाणे अशी आहेत जिथे काही कारणांमुळे जास्तीत जास्त पर्यटक भेट देतात. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला या लेखात भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या काही खास पर्यटन स्थळांबद्दल सांगणार आहोत. तुम्हीही पर्यटन प्रेमी असाल तर नवनवीन ठिकाणांना भेट द्यायला तुम्हाला आवडत असेल तर या ठिकाणांना तुम्ही आवर्जून भेट द्यायला हवी.

ताजमहाल

आग्रा येथील यमुना नदीच्या काठावर हस्तिदंती पांढऱ्या संगमरवरी बनलेला ताजमहाल त्याच्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. ताजमहालच्या निमित्ताने अनेक पर्यटक दरवर्षी भारताच्या भेटीला येत असतात. लोक हा अलैकिक अजूबा पाहून आश्चर्यचकीत होतात आणि येथील सुंदर दृश्यांचा मनभरून आनंद लुटतात. मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ हे ताजमहाल बांधला होता.

ट्रॅव्हल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

बनारस

बनारस हे उत्तर प्रदेशातील एक धार्मिक स्थळ आहे ज्याला काशी असेही म्हणतात. लोक जिवंत असताना या स्थानाचा आनंद घेतात, परंतु हिंदू धर्मावर विश्वास ठेवणारे बहुतेक लोक मोक्ष मिळविण्यासाठी काशीमध्ये आपल्या प्राणांची आहुती देऊ इच्छितात. बनारसमध्ये अनेक सुंदर मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत ज्यांना तुम्ही भेट देऊ शकतात. हे देशातील एक सुप्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.

राजस्थान

हे क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य आहे आणि जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर, अजमेर, बिकानेर, माउंट अबू आणि पुष्कर यांसारखी अनेक पर्यटन स्थळे या राज्याला लाभली आहेत. या सर्व ठिकाणांची स्वतःची खासियत आहे. इथे तुम्ही मोठमोठे भव्य राजवाडे आणि त्यांचा इतिहास जाणून घेऊ शकता.

ट्रॅव्हल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शिमला

हिमाचल प्रदेशात वसलेले शिमला हे कोणत्याही वीकेंडची योजना करण्यासाठी अतिशय सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळ आहे. शिमला येथे भेट देण्याची ठिकाणे आणि आकर्षणे आहेत – चॅडविक फॉल्स, द ग्लेन, काली बारी मंदिर, हिमालयन बर्ड पार्क, तट्टापानी हॉट स्प्रिंग्स, स्कँडल पॉइंट, माशोब्रा, नालदेहरा गोल्फ पार्क, द रिज, कुफरी, ग्रीन व्हॅली, चैल, कियाला , क्राइस्ट चर्च, कुठार किल्ला, जॉनी वॅक्स म्युझियम, समर हिल. बहुतेक कपल्सचे शिमला हे आवडते हनिमून डेस्टिनेशन आहे.

Web Title: Most visit tourist spot in india you should must try once

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 09:36 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.