हिवाळा सुरू होण्यापूर्वी, लोक भेट देण्यासाठी उबदार ठिकाणे शोधू लागतात. जिथे त्यांना थंडीपासून दूर राहून निवांत वेळ मिळू शकेल. अनेकजण असे असतात ज्यांना हिवाळा हा ऋतू फारसा आवडत नाही. हिवाळ्याची थंडी बऱ्याच लोकांना सहन होण्यासारखी नसते अशात तुम्हीही ट्रीपसाठी या मोसमात एक उबदार ठिकाण शोधत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
भारतात अशी काही ठिकाणे आहेत जी हिवाळ्यातही उबदारपणाची अनुभूती देतात. त्यामुळे सुट्टीची मजाही द्विगुणित होते. या ठिकाणांना भेट देऊन, तुम्ही केवळ हिवाळ्याचा आनंद घेऊ शकत नाही तर सुंदर दृश्ये, नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक ठिकाणे देखील एक्सप्लोर करू शकता. तुम्हाला मित्रांसोबत सहलीची योजना करायची असेल किंवा कुटुंबासोबत निवांत क्षण घालवायचे असतील, ही ठिकाणे प्रत्येकासाठी योग्य आहेत. या हिवाळ्यात या ठिकाणांना भेट देण्याचे नियोजन केल्यास हा अनुभव तुमच्यासाठी स्वर्गाहून कमी नाही.
ट्रॅव्हल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कच्छचे रण (Rann Of Kutch)
गुजरात हिवाळ्यात भेट देण्यासाठी एक सर्वोत्तम ठिकाण आहे. तुम्ही गुजरातमधील कच्छच्या रणला जाऊ शकता. इथे तुम्हाला थंडी अजिबात जाणवणार नाही. इथे गेलात तर इथल्या रण महोत्सव पाहण्यासाठी जरूर जावा. दरवर्षी हिवाळ्यात या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा रण महोत्सव 11 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाला आहे. जो 25 मार्च 2025 रोजी संपेल. हे ठिकाण पांढऱ्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी हे ठिकाण स्वर्गासारखे दिसते.
गोवा (Goa)
गोवा हे भारतातील सुप्रसिद्ध फिरण्यासाठीचे ठिकाण आहे. हिवाळ्यात गोव्याला भेट दिल्याने तुम्हाला उत्तम अनुभव मिळू शकतो. हिवाळ्यात भेट देण्यासाठी हे ठिकाण उत्तम मानले जाते. कारण या दिवसांत गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांना भेट देण्याची एक वेगळीच मजा आहे. येथे तुम्ही हिवाळ्यात कधीही मित्र, कुटुंब किंवा जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता. येथे तुम्ही नाईट क्लबचा आनंद घेऊ शकता.
ट्रॅव्हल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
राजस्थान (Rajasthan)
राजस्थानला पिंक सिटी असेही म्हटले जाते. इथे फक्त वाळूच वाळू दूरवर दिसते. हिवाळ्यात राजस्थानला भेट देण्याचे अनेक पर्याय आहेत. येथे तुम्ही हवा महल, नाहरगड किल्ला, आमेर किल्ला, जंतर-मंतर यासारख्या अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. तुम्ही येथे तलावांचे शहर उदयपूरलाही भेट देऊ शकता, जिथे तुम्हाला शाही वागणुकीचा सुरेख अनुभव घेता येईल.
टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.