गोव्यातील या सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या
अनेकदा सुट्टीत कुठे फिरायला जायचे असा प्रश्न पडतो. मग पहिल्यांदा मनात नाव येते ते गोव्याचे. भारतातील सुंदर आणि एक लोकप्रिय ठिकाण असलेले हे गाव त्याच्या सुद्रकिनाऱ्यंसाठी प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहित आहे का, गोवा फक्त समुद्रकिनाऱ्यासाठी आणि बिअर साठी प्रसिद्ध नाही. गोव्यात अशी अनेक लोभनीय ठिकाणे आहेत जी पाहून तुम्हाला आनंद येईल. गोव्यातील जीवनशैली अनेक लोकांना आकर्षित करते. दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात. ज्यामुळे येथील समुद्रकिनाऱ्यांवरी खूप गर्दी असते. तर गोव्यातील समुद्रकिना-यांव्यतिरिक्त ही ठिकाणे देखील खूप प्रसिद्ध आहेत जिथे तुम्ही एकदा नक्की भेट द्यावी. गोव्यातील ही ठिकाणे तुम्हाला भुरळ घालतील आणि तुम्हाला येथे पुन्हा पुन्हा येऊ वाटेल. चला तर मग जाणून घेऊयात या खास ठिकाणांबद्दल सांगतो जिथे तुम्ही तुमची सुट्टी घालवू शकता.
दूधसागर धबधबा
गोव्यातील दूधसागर धबधबा अप्रतिम आहे, जो ट्रेकिंग आणि जीप सफारीसाठी खूप प्रसिद्ध आहे. या धबधव्याला दूधसागर फॉल्स म्हटले जाते कारण हा अगदी दूधासारखा दिसतो. हा धबधबा एक चित्तथरारक नैसर्गिक सौंदर्याचा अभिमान बाळगतो. दूधसागर धबधबा पणजी शहरापासून सुमारे 60 किमी अंतरावर आहे.
अंजुना बीच
अंजुना बीच गोव्यातील प्रसिद्ध बीच पैकीच एक ऐतिहासिक बीच आहे. हे बीच नाइटलाइफ आणि बाजारपेठांसाठी ओळखले जाते. गोव्याची कोणतीही ट्रीप अंजुना बीचला भेट दिल्याशिवाय अपूर्ण आहे. तुम्ही त्याच्या चकचकीत समुद्रकिनाऱ्यावर काही वेळ घालवला तर तुम्हाला अगदी शांत वाटेल. या सुद्राचे दृश्य एक अनोखा अनुभव देते.
अगौंडा किल्ला
हा गोव्यातील सर्वात जुना किल्ला आहे. हा किल्ला समुद्रकिनारी आहे. या किल्ल्यावरून गोव्यात्या समुद्राते विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. गोव्याच्या या किल्ल्यावर इतिहास जिवंत होताना पाहायचा असेल तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हिवाळ्यात नक्की भेट द्या. या कालावधीत येथील तापमान 20 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहते.
कळंगुट बीच
गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक कळंगुट बीच. या समुद्रकिनाऱ्याला ‘किनाऱ्यांची राणी’ म्हणतात. या ठिकाणचे सौंदर्य आणि येथे उपलब्ध जलक्रीडा यामुळे ते विशेष आहे. कळंगुट बीच जलक्रीडा, समुद्रकिनाऱ्यावरील शॅक आणि दोलायमान नाईटलाइफसाठी ओळखला जाते. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात.
चापोरा किल्ला
गोव्यातील हा किल्ला ऐतिहासिक ठिकाण आहे. जिथून आजूबाजूच्या परिसराचे सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळते. असे म्हटले जाते किल्ल्याच्या आत, सेंट अँथनीला समर्पित केलेले चर्च गायब झाले आहे आणि आत फक्त काही खुणा उरल्या आहेत ज्यांनी एकेकाळी हा विस्तीर्ण परिसर व्यापला होता.
गोव्यातील चर्च
गोवा समुद्रकिना-याशिवाय ज्या गोष्टीसाठी ओळखला जातो ते म्हणजे गोव्यातील चर्च. जसे की बॉम जीझस बॅसिलिका, त्याच्या वास्तुकला आणि धार्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. गोवा ही पोर्तुगीज भारत आणि आशियाची राजधानी होती. तसेच गोवा 16 व्या शतकापासून धर्मप्रसाराचे केंद्र बनले होते. गोव्यातील धार्मिक वास्तूंचाही जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. गोव्यातील या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याचा आणि सांस्कृतिक वारशाचा आनंद घेऊ शकता. तुम्ही तुमच्या कुटूंबासह, मित्रांसोबत गोव्यातील या ठिकाणांना भेट देऊ शकता.