विकेंड ट्रीप प्लॅन करताय? मग उज्जैनच्या या आसपासाच्या अद्भुत ठिकाणांना नक्की भेट द्या
उज्जैन म्हटलं की सर्वप्रथम आपल्या मनात महाकालेश्वर मंदिर आणि कुंभमेळ्याचे पवित्र स्थान येते. उज्जैन हे मध्य प्रदेशातील महत्त्वपूर्ण धार्मिक शहर असून दर महिन्याला लाखो भाविक महाकालाचे दर्शन घेण्यासाठी शिप्रा नदीच्या काठावर असलेल्या या शहरात येतात. मात्र, उज्जैनच्या आसपास अशीही अनेक आकर्षक ठिकाणे आहेत जी भेट देण्यासारखी आहेत. महाकालला भेट दिल्यानंतर तुम्हाला उज्जैनची काही अद्भुत ठिकाणे पाहायची असतील तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला उज्जैनच्या आसपास असलेल्या काही खास आणि प्रसिद्ध ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
चला तर मग जाणून घेऊयात उजैनच्या आसपास कोणती अद्भुत ठिकाणे आहेत
देवास
उज्जैनपासून 40 किमी अंतरावर असलेले देवास हे माळवा प्रदेशातील एक सुंदर शहर आहे. देवासमध्ये चामुंडा माँ आणि तुळजा भवानी मंदिरांसारखी प्रसिद्ध मंदिरे आहेत, जे श्रद्धाळूंसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याशिवाय येथे तुम्हाला किल्ल्यांचे अवशेष आणि निसर्गरम्य दृश्ये अनुभवता येतील. तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल तर देवासमधील उंच टेकड्यांमुळे हे ठिकाण फोटोग्राफीसाठी उत्तम आहे.
पातालपाणी धबधबा
उज्जैनपासून सुमारे 93 किमी अंतरावर असलेला पातालपाणी धबधबा इंदूरच्या आसपासच्या सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. धबधब्याचे पाणी 300 मीटर उंचीवरून खाली कोसळते. या धबधब्याचे एक अद्वितीय दृश्य पर्यटकांना आकर्षित करते. पावसाळ्यात येथील सौंदर्य आणखीनच वाढते. येथील घनदाट जंगल आणि पर्वतरांगा पाहून पर्यटकांना येथील निसर्गाचा अनुभव घ्यायला आवडतो.
चोरल धरण
उज्जैनपासून 109 किमी अंतरावर असलेले चोरल धरण हे इंदूरच्या नजीकच्या प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. घनदाट जंगल, हिरवळ, बॅकवॉटर आणि टेकड्यांनी वेढलेले हे ठिकाण वीकेंडला निवांत वेळ घालवण्यासाठी योग्य आहे. येथील स्वच्छ पाणी, शांत वातावरण आणि सुंदर दृश्ये पर्यटकांना आकर्षित करतात. धरणाच्या आजूबाजूला असलेली छोटी टेकड्या आणि हिरवळ हे ठिकाण अधिकच सुंदर बनवतात.
रतलाम
उज्जैनपासून 103 किमी अंतरावर असलेले रतलाम हे मध्य प्रदेशातील हिरवाईने वेढलेले आकर्षक शहर आहे. महाराजा रतन सिंह यांच्या काळात हे शहर सौंदर्याचे प्रतिक मानले जात असे. आजही रतलाम हे मनमोहक दृश्यांसाठी आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. राज्यभरातून पर्यटक दागिन्यांसाठी येथील चंडी चौकात येतात.
मग तुम्ही नक्कीच उज्जैनच्या या ठिकाणांना तुमच्या परिवारासोबत भेट देण्याचा नक्की प्लॅन करा आणि तुमची ट्रीप संस्मरणीय बनवा.