फोटो सौजन्य: iStock
आजपासून हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळीला सुरूवात झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गोवर्धन पूजा, भाऊबीज आणि गुरुगोविंद सिंह जयंतीच्या सुट्ट्या असल्याने लाँग वीकेंड मिळणार आहे. यामुळे तुम्ही फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही या काळात फिरण्यासाठी काही ठिकाणांना भेट देऊ शकता.
यासाठी सर्वोत्तम ठिकाणांमध्ये ओरछा, मांडू, जबलपूर, आणि खजुराहो यांची नावे तुमच्या यादीत जोडा. ओरछा आणि खजुराहो येथे प्राचीन मंदिरं पाहता येतील, तर मांडूमध्ये ऐतिहासिक वास्तूंचा आनंद घेता येईल. जबलपूरमध्ये नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. या ठिकाणी स्वस्त आणि अनुकूल सहलीचा अनुभव मिळेल.
ओरछा
झाशीपासून जवळ असलेले ओरछा हे मध्य प्रदेशातील एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे. येथील राजा राम मंदिर प्रसिद्ध आहे, जिथे भगवान रामांना राजा राम म्हणून पूजा केली जाते. या ठिकाणी भेट देण्यासाठी एक ते दोन दिवस पुरेसे आहेत. ओरछा येथे राजा महल, जहांगीर महल, शीश महाल, चतुर्भुज मंदिर, रामराजा मंदिर, लक्ष्मी पॅलेस आणि बेटवा नदीच्या काठावर बांधलेला कांचना घाट ही ठिकाणे पाहता येतील.
मांडू
इंदूरपासून सुमारे ९० किमी अंतरावर असलेले मांडू ऐतिहासिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. येथे हिंदोळा महल, जहाज महल, होशांग शाहचा मकबरा, जामा मशीद, बाज बहादूरचा राजवाडा, चंपा बाओली आणि अशरफी महल पाहता येतात. इंदूरमध्ये राहून तुम्ही महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनलाही जाऊ शकता. मांडूची सफर इतिहासप्रेमींना विशेष आनंद देईल.
हे देखील वाचा- ‘सिल्क सिटी’ सुरतमध्ये ‘ही’ ठिकाणे आहेत खूप सुंदर; तुमच्या पार्टनरसोबत नक्की भेट द्या
जबलपूर
मध्य प्रदेशातील जबलपूर हे निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. येथील धुंधर, भेडाघाट, मदनमहाल किल्ला, डुमना नेचर रिझर्व्ह पार्क आणि बॅलन्सिंग रॉक हे प्रमुख आकर्षण आहेत. जबलपूरमध्ये नैसर्गिक धबधबे आणि नद्या निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत.
खजुराहो
बुंदेलखंड प्रदेशातील खजुराहो हे प्राचीन मंदिरांसाठी जगप्रसिद्ध आहे. येथील पश्चिम, पूर्व आणि दक्षिणेकडील मंदिरे खूपच आकर्षक आहेत. मावळत्या सूर्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी येथील तलाव एक उत्तम ठिकाण आहे. खजुराहोमधील प्राचीन स्थापत्यकला आणि मूर्तिशिल्प पाहण्यासाठी तुम्हाला दोन-तीन दिवसांची गरज भासू शकते.
नोव्हेंबरच्या लाँग वीकेंडमध्ये या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही स्वस्त आणि अनुकूल सहल अनुभवू शकता. या ठिकाणांची भेट तुमच्या प्रवासातील आनंद द्विगुणित करेल आणि तुम्हाला एक अविस्मरणीय अनुभव देईल. त्यामुळे तुमच्या सहलीचे नियोजन आतापासूनच करा आणि या सुंदर ठिकाणांचा आनंद घ्या.
हे देखील वाचा- IRCTC ची ‘रॉयल राजस्थान’ टूर; कमी बजेटमध्ये देता येणार ‘या’ शहरांना भेट