फोटो सौजन्य: सोशल मीडिया
दिवाळीची सुरूवात धनत्रयोदशीचा सणाने होते. या सणाला धनतेरस म्हणूनही ओळखले जाते. आज धनतेरस असून आजच्या दिवशी लोक आरोग्य व संपत्तीचे देव भगवान धन्वंतरी म्हणजेच कुबेर भगवंतांची पूजा करतात. तसेच आजच्या दिवशी चांदी-सोन्याचे दागिने, भांडी आणि झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. आज आपण या सणानिमित्त भगवान कुबेराच्या एका खास अशा मंदिराबद्दल जामून घेणार आहोत. या मंदिराला कधीही कुलूप लावले जात नाही.
चला तर मग जाणून घेऊयात भगवान कुबेराच्या अनोख्या मंदिराबद्दल
तर भगवान कुबेराचे हे मंदिर मंदसौर म्हणजे मध्य प्रदेशातील खिलचीपुरा येथे आहे. हे एक अद्वितीय मंदिर आहे. या मंदिरात कुबेराची भगवान शंकर आणि माता पार्वतीसोबत पूजा केली जाते. या मंदिराला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. आजच्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी, पहाटे चार वाजता येथे तंत्रपूजन करण्याची परंपरा आहे. या विशेष तंत्रपूजेनंतर भाविक मंदिरात दर्शनासाठी जातात. असे मानले जाते की या पूजेने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
मंदिराचा इतिहास
पौराणिक कथेनुसार, या मंदिरात स्थापित भगवान कुबेराची मूर्ती आहे. ही मूर्ती सुमारे 1300 वर्षे जुनी आहे. असे म्हटले जाते की, ही मूर्ती खिलजी साम्राज्यापूर्वीची आहे. विशेष म्हणजे, या मंदिराच्या गर्भगृहाला कधीच कुलूप लावले जात नाही. तर या मंदिराचे बांधकाम करण्यात आल्यानंतर सुरूवातीला या मंदिराच्या गर्भगृहाला दरवाजेही नव्हते. कुबेराच्या मूर्ती चतुर्भुज स्वरूपात आहे. एका हातात पैशांचे बंडल, दुसऱ्या हातात शस्त्र, आणि एका हातात पाण्याचा गडू. याशिवाय, भगवान कुबेर मुंगूसावर स्वार आहेत. ही मूर्ती भगवान कुबेराच्या अनोख्या रूपाचे दर्शन देते.
मंदिराच्या बांधणीचा काळ
इतिहासानुसार, हे पवित्र मंदिर मराठा साम्राज्याच्या काळात बांधण्यात आले. तसेच मूर्तीची निर्मिती कालखंड गुप्त साम्राज्याच्या सातव्या शतकात करण्यात आली आहे. असे मानले जाते की कुबेराच्या या मंदिरात एकदा दर्शन घेतल्याने भक्तांच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात. त्यांचे आयुष्य सुख-समृद्धीने परिपूर्ण होते. त्यामुळे तुम्ही जर कुबेराचे आशीर्वाद घेण्याचा विचार करत असाल तर खिलचीपुरा येथील या मंदिराला भेट देणे एक अनोखा आणि शुभ अनुभव ठरू शकतो.
हे देखील वाचा- पक्ष्यांच्या दुनियेतील रहस्य: एक असा पक्षी जो मागच्या दिशेनेही उडतो; जाणून घ्या कसे?