राजस्थानमधील एक असे गाव जिथे आजपर्यंत कधीही चोरी झाली नाही; जाणून घ्या काय आहे खासियत?
राजस्थानची संस्कृती आणि जीवनशैली खूप अनोखी आहे. राजस्थानी बोलचाल, कपडे आणि खाण्यापिण्याच्या सवयी सर्व गोष्टी स्वतःमध्ये खास आहेत. आता राजस्थानच्या खास वैशिष्ट्यांमध्ये आणखी एक गोष्ट जोडली जाईल. ते म्हणजे येथील देवमाळी गाव. राजस्थानमधील बेवार जिल्ह्यातील हे एक छोटेसे गाव आहे. या देवमाळी गावाला भारतातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून मान्यता मिळालेली आहे. केंद्र सरकारतर्फे 27 नोव्हेंबर रोजी दिल्लीत या गावाला भारतातील सर्वोत्तम पर्टन गाव म्हणून पुरस्कार मिळणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की या गावामध्ये इतकं काय खास आहे, ज्याच्यामुळे या गावाला हा पुरस्कार देण्यात येत आहे. चला तर मग जाणून घेऊया देवमाळी गावाची खासियत.
देवमाळी गावाचे वैशिष्ट्य काय?
देवमाळी गावाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथे राहणाऱ्या कोणाच्याही नावावर जमीन नाही. 3000 बिघामध्ये पसरलेल्या या गावातील लोकांचा विश्वास आहे की संपूर्ण जमीन त्यांच्या आराध्य देवता भगवान देवनारायण यांच्या मालकीची आहे. या विश्वासामुळे गावात जमीन विक्री, मालकी हक्क यांची प्रथा नाही. येथे राहणाऱ्या लोकांचे जीवन अत्यंत साधे आहे. येथील लोक त्यांच्या परंपरांचे पालन अत्यंत काटेकोरपणे करतात.
याशिवाय या गावात एकही कायमस्वरूपी गर नाही. गावातील सर्व घरे मातीची आहेत. तसेच घरांच्या छतावर गवत आहे. या गावातील लोकांची जीवनशैली अगदी अनोकी आहे. या गावातील लोक कोणत्याही प्रकारचा मांसाहार करत नाही सर्वजण शाकाहारी आहेत. तसेच या गावामध्ये दारूला बंदी आहे. याशिवाय स्वयंपाक करण्यासाठी रॉकेल केल आणि कडुलिंबाची लाकडे वारण्यास पूर्णपण मनाई आहे. या लोकांचे हे राहणीमान त्यांच्या साधेपण दर्शवतात.
आजपर्यंत एकही चोरी झाली नाही
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे शनीशिंगनीपूर सारखे या गावात देखील आजपर्यंत एकही चोरीची घटना घडलेली नाही. देवमाळी गावातील लोक त्यांच्या घरांना कुलूप लावत नाहीत. गावातील या अनोख्या परंपरा आणि संस्कृतीला अधिक चालना देण्यासाठी या वर्षी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव ठरले आहे. देवमाळीची शांत, नैसर्गिक आणि सांस्कृतिक जीवनशैली पाहण्यासाठी राजस्थानमदील हे गाव पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे. राजस्थानला भेट देताना या गावाला भेट देण्याचा पर्यटकांनी नक्कीच विचार करावा, अशी स्थानिक प्रशासनाची विनंती आहे.