जगातील असे शहर जिथे फक्त 30 लोक राहत होते
सध्या संपूर्ण जभर अनेक देशामध्ये लोकसंख्येत वाढली आहे. सगळ्यात जास्त लोकसंख्या ही चीनमध्ये आहे. तर आपला भारत तिसऱ्या क्रमांकावर येतो. अशा वेळी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक नियम लागू केले जातात. आज आम्ही तुम्हाला अशा शहराविषयी सांगणार आहोत जिथे लोकसंख्या खुपच कमी आहे. वास्तविक हा देश एक पर्यंटन स्थळ असून देश-विदेशातून अनेक पर्यटक या शहराला भेट देण्यासाठी येतात. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या मते, येतील लोक खूप मनमिळाऊ आहेत. चला तर मग जाणून घेऊयात हे शहर कुठे आहे.
तर मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व युरोपमध्यी क्रोएशिया देशातील पॅनोनियन मैदानामधील म्हणजे बाल्कन आणि भूमध्य समुद्राच्या दरम्यान हे शहर वसलेले आहे. हे शहर संसदीय प्रजासत्ताक असून येथील पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख आणि राष्ट्रपती राज्याचे प्रमुख असतात. या शहराची जणगणना जगातील सर्वात लहान शहरांमध्ये केली जाते. या शहराचे नाव ‘हम’ आहे. वाटून आश्चर्य वाटले ना? पण होय या शहराचे नाव ‘हम’ आहे.
2011 मध्ये लोकसंख्या फक्त 30
मीडिया रिपोर्टनुसार, 2021 मध्ये या देशाची जणगणना करण्यात आली तेव्हा येथील लोकसंख्या 52 होती. मात्र 2011 मध्ये या देशात फक्त 30 लोक राहत होते. हे शहर मिर्ना नदीपासून 349 मीटर उंचीवर वसलेले आहे.
या शहरात भेट देण्यासारखे काय आहे?
या शहराच्या वैशिष्टांबद्दल बोलायचे झाले तर, या शहरात 100 मीटर लांब आणि 30 मीटर रूंद असे शहराचे प्रवेशद्वार आहे. याशिवाय या शहरात फक्त दोन रस्ते आणि 20 इमारती आहेत. तसेच एक राजवाडा, टेहळणी बुरूज आणि दोन चर्च देखील आहेत ज्याचे सौंदर्य अप्रतिम आहे. हम शहरामध्ये सेंट जेरोम नावाचे एक चर्च आहे जे 120 शतकात बांंधले गेले होते. याशिवाय ‘असम्पशन ऑफ द ब्लेस्ड व्हर्जिन मेरी’ हे देखील दुसरे चर्च जे 1802 मध्ये बांधण्यात आले होत. ही ठिकाणे प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. या ठिकाणांना पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात.
या शहराला स्वत:चे एक रेल्वे स्टेशन देखील आहे. या रेल्वे स्टेशनचे नाव हम रेल्वे स्टेशन आहे. तसेच इतर शहरांप्रमाणे हे शहर देखील विकसित झालेले आहे. तुम्ही तुमच्या कुटूंबासह, मित्रांसह या ठिकामाला नक्की भेट द्या. येथील लोकांचा मन मिळाऊ स्वबावामुळे हे शहर तुम्हाला आपलेसे वाटेल.