बंगालमध्ये न जाता दुर्गा पूजा अनुभवण्याची इच्छा आहे? तर दिल्लीतील या प्रसिद्ध मंडळांना नक्की भेट द्या
देशभरात गुरुवार, ३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. सर्वत्र आनंदात नवरात्री साजरी होताना पाहायला मिळत आहे. नवरात्रीच्या या सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या काळात नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देशभरात या सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. नवरात्री म्हटली की डोळ्यासमोर उभी राहते बंगालमधील दुर्गा पूजा. बंगालमध्ये मोठ्या उत्साहात दुर्गा पुजेचा उत्सव साजरा केला जातो. अनेकांची इच्छा असते की एकदा तरी बंगालमधील दुर्गा पुजेचा अनुभव घ्यावा. पण यासाठी प्रत्येकालाच बंगालला जाणं शक्य होत नाही.
हेदेखील वाचा- Hotel Check-out Mistakes: हुशार लोकंही हॉटेल चेक आऊटवेळी करतात या 6 चुका
पण आता तुम्ही बंगालमध्ये न जाता देखील बंगालमध्ये साजरा होणाऱ्या दुर्गा पूजेचा अनुभव घेऊ शकता. दिल्लीत अनेक प्रसिद्ध दुर्गा मंडळ आहेत, जे बंगाली परंपरेनुसार हा उत्सव साजरा करतात. तुम्हालाही दिल्लीत कोलकात्याच्या दुर्गापूजेचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही येथे असलेल्या या प्रसिद्ध दुर्गा मंडळांना भेट देऊ शकता.
आरामबाग दुर्गा पूजा तिच्या रचनात्मक आणि थीमवर आधारित मंडळासाठी ओळखली जाते. दुर्गा मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने लोक येतात. हे मंडळ खास आहे कारण येथील आयोजक दरवर्षी नवीन थीम घेऊन येतात, ज्या दिल्ली आणि बाहेरील लोकांना आकर्षित करतात. हे मंडळ पंचकुयान रोड, पहाडगंज, मध्य दिल्ली येथे आहे आणि जवळचे मेट्रो स्टेशन रामकृष्ण आश्रम मार्ग (ब्लू लाइन) आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
कॅनॉट प्लेस येथील काली बारी दुर्गा मंडळ हे शहरातील सर्वात जुने आणि सर्वात पारंपारिक दुर्गा पूजा उत्सवांपैकी एक आहे. हे मंडळ एक अध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभव देतो, जे पाहण्यासाठी लोक लांबून येतात. हे मंडळ त्याच्या साधेपणासाठी आणि विधींसाठी ओळखले जाते. हे मंडळ मंदिर मार्ग, कॅनॉट प्लेस, मध्य दिल्ली येथे उभारण्यात आले आहे. येथे जाण्यासाठी तुम्हाला आरके आश्रम मार्ग (ब्लू लाइन) या जवळच्या मेट्रो स्टेशनवर यावे लागेल.
हेदेखील वाचा- देशातील ही 6 मंदिरे त्यांच्या प्रसादासाठी आहेत प्रसिद्ध, नक्की आस्वाद घ्या!
सीआर पार्क म्हणजेच चित्तरंजन पार्क हे सामान्यतः “मिनी कोलकाता” म्हणूनही ओळखले जाते. राजधानी दिल्लीत हे दुर्गापूजा उत्सवाचे केंद्र आहे. सीआर पार्क काली मंदिर हे बंगाली आणि इतरांसाठी एक प्रमुख केंद्र आहे. येथे जाण्यासाठी, तुम्ही नेहरू प्लेस (व्हायोलेट लाइन) किंवा नेहरू एन्क्लेव्ह (मॅजेन्टा लाइन) जवळच्या मेट्रो स्टेशनवर पोहोचू शकता.
पश्चिम दिल्लीच्या पश्चिम विहारमध्ये स्थित निवेदिता एन्क्लेव्ह पंडाल हे देखील शहरातील प्रसिद्ध मंडळांपैकी एक आहे. पश्चिम दिल्लीच्या पश्चिम विहारमधील निवेदिता एन्क्लेव्ह हे निवासी क्षेत्र आहे, ज्याला “बंगाली कॉलनी” असेही म्हणतात. हे या प्रदेशातील सर्वात जुन्या दुर्गा पूजा उत्सवांपैकी एक आहे. येथे जाण्यासाठी तुम्हाला पश्चिम विहार (ब्लू लाइन) या जवळच्या मेट्रो स्टेशनवर जावे लागेल.
मातृ मंदिर पूजा हा दिल्लीचा आणखी एक प्रसिद्ध दुर्गा पूजा उत्सव आहे, जो नृत्य, संगीत आणि नाटकासह इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ओळखला जातो. हे मंडळ समृद्ध बंगाली परंपरांचा अनुभव देते. येथे जाण्यासाठी तुम्हाला जवळच्या मेट्रो स्टेशन ग्रीन पार्क (यलो लाइन) वर यावे लागेल.