Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जनजागृती मोहीम, National Water Mission आणि Ministry of Jal Shakti यांचा ‘जल वाणी’ उपक्रम सुरू

National Water Mission आणि Ministry of Jal Shakti चा ‘जल वाणी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे दररोज पाणी वाचवण्याचे नागरिकांना आवाहन देण्यात आले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 18, 2026 | 06:30 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

भारतामध्ये वाढती पाणीटंचाई, प्रदूषित नद्या आणि अनियमित पाणीपुरवठा ही गंभीर समस्या बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर National Water Mission आणि Ministry of Jal Shakti यांनी ‘जल वाणी’ हा जनजागृती उपक्रम सुरू केला आहे.या देशव्यापी मोहिमेत ‘मिर्ची’च्या सहकार्याने नागरिकांना दररोजच्या छोट्या कृतींमधून पाणी वाचवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. घरातील नळ वेळेवर बंद ठेवणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, पावसाचे पाणी साठवणे अशा साध्या सवयींमधून मोठा बदल घडवता येऊ शकतो, हा या मोहिमेचा मुख्य संदेश आहे.

या उपक्रमाला गायक Mohit Chauhan, अभिनेत्री Taapsee Pannu आणि दिग्दर्शक Anubhav Sinha यांचा पाठिंबा लाभला आहे. त्यांच्या माध्यमातून पाणी संवर्धनाचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याबतीत गायक मोहित चौहान म्हणाले, “पाणी ही अशी गोष्ट आहे की, त्याची कमतरता जाणवली की आपण पाण्याला गांभीर्याने घेतो. ‘जल वाणी’चा भाग होताना मला लोकांना आठवण करून देता आली की प्रत्येक कृती महत्त्वाची असते. नळ बंद करणे, प्रत्येक थेंब जपणे किंवा आजूबाजूच्या पाण्याच्या अपव्ययाकडे लक्ष देणे. या छोट्या कृतींतूनच मोठी जाणीव निर्माण होते. माझा आवाज लोकांना थांबून विचार करायला आणि कृती करायला प्रेरणा देईल, अशी आशा आहे. जल शक्ती मंत्रालय आणि मिर्ची यांनी हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल मला आनंद आहे.” अभिनेत्री तापसी पन्नू यांनीही सामूहिक जबाबदारीवर भर देत सांगितले, “पाणी संवर्धन हा फक्त धोरणांचा विषय नाही, तर प्रत्येकाने स्वीकारायची वैयक्तिक जबाबदारी आहे. आज आपण वाचवलेला प्रत्येक थेंब म्हणजे पुढील पिढ्यांसाठी दिलेले आश्वासन आहे.”

दिल्लीमध्ये ‘जल वाणी’ मोहिमेअंतर्गत एक वेगळा आणि विचार करायला लावणारा प्रयोग करण्यात आला. National Water Mission आणि Ministry of Jal Shakti यांच्या सहकार्याने ‘मिर्ची जल वाणी’ मोहिम राबवली जात आहे.या मोहिमेत आरजे नवेद यांनी गजबजलेल्या ठिकाणी मुद्दाम एक नळ गळत ठेवला. अनेक लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र काही जण थांबले आणि त्यांनी तो नळ बंद केला. या छोट्या पण महत्त्वाच्या कृतीसाठी त्यांना ‘जल वॉरियर्स’ म्हणून सन्मानित करण्यात आले. या प्रयोगातून रोजच्या छोट्या कृतींमधूनही जागरूकता कशी दिसून येते, हे अधोरेखित झाले.

मोहिमेत सहभागी झालेल्या वॉटर वॉरियर्सनी सांगितले की, भारतातील पाण्याची समस्या ही वर्षानुवर्षे वाढलेला वापर, प्रदूषण आणि निसर्गाच्या मर्यादांकडे दुर्लक्ष यामुळे निर्माण झाली आहे. हा प्रश्न केवळ पाण्याच्या उपलब्धतेचा नसून, लोकांच्या विचारसरणी आणि जबाबदारीचाही आहे. सरकार योजना आखू शकते, नियम बनवू शकते; पण पाणी ही मर्यादित आणि सर्वांची समान संपत्ती आहे, ही जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.

आरजेच्या माध्यमातून तयार केलेल्या डिजिटल कंटेंटद्वारे ही मोहीम विशेषतः शहरांतील तरुणांपर्यंत पोहोचवली जात आहे. ‘जल वाणी’च्या माध्यमातून नागरिकांना पाणी हे मौल्यवान संसाधन आहे आणि ते जपून वापरणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश दिला जात आहे.

Web Title: National water mission and ministry of jal shakti launch the jal vaani initiative

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • delhi
  • Famous Singer
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: रुग्णालयात उपचारासाठी आले, पण लिफ्टच बंद! पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील गैरसोयींमुळे नागरिक हैराण
1

Mira Bhayandar News: रुग्णालयात उपचारासाठी आले, पण लिफ्टच बंद! पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील गैरसोयींमुळे नागरिक हैराण

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक
2

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक

Nagpur District : पावसाने पाठ फिरवली, धरणे आटली; पाच प्रमुख जलाशयांत केवळ ६१% पाणीसाठा
3

Nagpur District : पावसाने पाठ फिरवली, धरणे आटली; पाच प्रमुख जलाशयांत केवळ ६१% पाणीसाठा

Amravati News: पाण्याची टाकी असूनही कृत्रिम पाणीटंचाई! नदीवर अवलंबून राहण्याची वेळ; निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा
4

Amravati News: पाण्याची टाकी असूनही कृत्रिम पाणीटंचाई! नदीवर अवलंबून राहण्याची वेळ; निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.