प्रवासादरम्यान गोंधळातही झोप का येते? जाणून यामागची कारणे
अनेकदा आपण कुठे फिरायला जातो वेळी आपल्यात खूप उत्साह असतो. बाहेर कुठेतरी फिरायला जामार या विचारानेच मन अगदी प्रसन्न होऊन जाते. पण तुम्ही अनेकदा पाहिले असेल काहीजण फिरायला जाताना गाडीत झोप काढतात. किंवा कुठेही जाताना बसमध्ये, ट्रेनमध्ये कितीही गोंधळ असेल तरी त्यांना झोप लागते. प्रवासादरम्यान वाहनात झोप येणे हा अनेक लोकांचा अनुभव आहे. लांब प्रवास असो किंवा छोटा, गाडीमध्ये बसताच अनेकांना झोप येते. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे की, प्रवासादरम्यान गोंधळ असला तरी आपल्यला शांत झोप का लागते. तर यामागे काही कारणे आहेत. आज आपण ती कारण या लेखात जाणून घेणार आहोत.
चला तर मग जाणून घेऊयात प्रवासादरम्यान झोप लागण्यामागची कारणे
तर प्रवासादरम्यान झाप येण्याची अनेक कारणे आहेत पण मुख्य कारण म्हणजे प्रवासात वाहन सतत गतीमान असते. हे वाहन कमी वारंवारतेने, हळूहळू हालचाल करत असते. या सततच्या हलक्याशा थरकापामुळे आपल्या शरीरावर एक प्रकारचा विश्रांतीसारखा परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला झोप येऊ लागते. याशिवाय प्रवासादरम्यान आपले डोळे आणि कान बाहेरील ध्वनी, दृश्यमानता यावर विशेष लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. यामुळे मेंदूला शांत होण्याची संधी मिळतेआणि झोपेची इच्छा वाढते. वाहन चालवताना बघण्यासारखे विशेष आकर्षण न मिळाल्यामुळे मेंदूमध्ये कोणताही विचार येत नाही.
तसेच काही लोक आधीच थकलेले असतात किंवा जेवढी झोप आवश्यक असते तेवढी झाप त्या व्यक्तींची झालेली नसते त्यामुळे प्रवासादरम्यान सहज झोप येते. कारच्या आतल्या एकसारख्या शांत वातावरणामुळे शरीर आरामशीरपणे विश्रांती घेते. तसेच नैसर्गिक प्रकाश देखील कमी असल्याने झोप येऊ लागते. लांब प्रवासादरम्यान वाचन, बोलणे किंवा कुठलीही आकर्षक कृती नसल्यास, एकसारखी स्थिती निर्माण होते. हा एकसुरीपणा मेंदूला थकवतो आणि मेंदू विश्रांती मोडमध्ये जातो.
झोप टाळण्यासाठी उपाय
तुम्हाला जर प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल आणि झोप टाळायची असेल तर तुम्ही काही उपाय देखील करू शकता यामुळे तुम्हाला तुमच्या प्रवासाचा आनंद घेता येईल. यासाठी तुम्हाला कुठेही फिरायला जाण्याआधी प्रवासापूर्वी पुरेशी झोप घ्यायची आहे. यामुळे नक्कीच झोप येण्याची शक्यता कमी होईल.
तसेच प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा जड नाश्ता न करता अगदी हलके नाश्ता केल्यास ऊर्जा टिकून राहते आणि झोप येत नाही. तुम्ही गाडीमध्ये गाणी एकणे, इतर प्रवाशांशी गप्पा मारू शकता. यामुळे मेंदू सक्रिय राहतो आणि झोप येत नाही. तसेच शक्य असल्यास खिडकीच्या बाजूलाही बसल्यास झोप येणार नाही कारण नैसर्गिक प्रकाश जाणवेल. अशा या काही सोप्या उपायांनी प्रवासादरम्यान येणारी झोप टाळता येऊ शकते.
हे देखील वाचा- सुर्याच्या पहिल्या किरणांचा अनुभव घ्यायचाय? मग भारतातील ‘या’ गावाला नक्की भेट द्या