अहिल्यानगर तालुक्यातील निंबळक येथे जुन्या मशिदीच्या जागेवर सुरू असलेल्या अनधिकृत वाढीव बांधकामामुळे निर्माण झालेला तणाव ग्रामसभेच्या निर्णयानंतर निवळला आहे. मशिदीच्या नावाखाली अतिरिक्त बांधकाम होत असल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्याविरोधात आवाज उठवला होता. या पार्श्वभूमीवर आयोजित ग्रामसभेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. गावातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी वाढीव बांधकामाला तातडीने स्थगिती देण्यात आली असून ग्रामपंचायतीच्या नियमांनुसार केवळ मूळ जागेवरच बांधकाम करण्याचे सांगण्यात आले….यावेळी हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांनी हनुमान मंदिरात महाआरती करून गावकऱ्यांशी संवाद साधला. मदरशांमधून होणाऱ्या बाहेरील व्यक्तींच्या वावराबद्दल आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यावर त्यांनी चिंता व्यक्त करत कडक भूमिकेचे समर्थन केले. खबरदारीचा उपाय म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सद्यस्थितीत गावात शांतता असून नियमांचे उल्लंघन न करण्याच्या अटीवर सहमती झाली आहे.