राहुरी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र ते पक्षाच्या चिन्हाऐवजी ‘अपक्ष’ म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय विश्वात सुरु आहे. तनपुरे यांनी अद्याप आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. आज अहिल्यानगरमध्ये जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक मोठी बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर खल झाला. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके यांनी “राजकारणात वेळ आणि काळ खूप महत्त्वाचा असतो”. अशी भूमिका मंडळी आहे. लंकेंच्या या विधानामुळे महायुती आणि भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लंके हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या शांततेमागे एखादा मोठा राजकीय भूकंप तर दडलेला नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.