रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संबंधित रुग्णाने वॉर्ड क्रमांक १२ आणि १३ मधील डॉक्टरांकडे मेडिकल डिस्चार्जची कागदपत्रे देण्याची मागणी केली. मात्र रुग्णालयाच्या नियमानुसार वैद्यकीय कागदपत्रे थेट बाहेर देणे शक्य नसल्याने डॉक्टरांनी त्यास नकार दिला.यामुळे संतप्त झालेल्या रुग्णाने आणि त्याच्या एका नातेवाईकाने डॉक्टरांच्या अंगावर धावून जात सलाईन स्टॅन्डने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी डॉक्टरांना शिवीगाळही करण्यात आली.या प्रकारामुळे रुग्णालयात सेवा देणारे इंटर्न डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी सुरक्षित आहेत का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर Association of State Medical Interns Maharashtra या संघटनेच्या वतीने रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना निवेदन देण्यात आले आहे. एका रुग्णासोबत केवळ एकच नातेवाईक ठेवण्याचा नियम काटेकोरपणे लागू करावा, हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांत तक्रार दाखल करावी तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.या सर्व मुद्द्यांवर आज तोडगा न निघाल्यास डॉक्टर आंदोलनाचा पवित्रा स्वीकारतील, असा इशाराही निवासी डॉक्टरांनी दिला आहे.