अकोला महापालिकेच्या निवडणुकीत प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी आलेले बच्चू कडू यांनी भाजपवर सडकून टीका केली. वरून स्वछ दिसणारे आतून तेवढेच काळे आहेत. प्रभू रामचंद्रांच नाव घ्यायच आणि रावणाच काम करायचं अशी अवलाद आहे. तुम्हाला माहित आहे जय श्रीराम म्हटलं की मतं मिळतात किती दिवस हे चालणार, त्या प्रभू रामचंद्रांचा धनुष्य तुमच्या छातड्यात घातल्याशिवाय राहणार नाही असा थेट बच्चू कडू यांनी भाजपला दिला आहे. यावेळी राणावरही बच्चू कडू यांच्या टीकेची झोड बरसली, हिंदू शेरणी म्हणते बटेंगे तो कटेंगे म्हणते, आणि तीचा नवराच भाजपमध्ये नाही. नवरा अल्लग तुम्ही अल्लग तर मुलाला प्रहारमध्ये द्या पाठवून असा सल्ला राणांना बच्चू कडू यांनी दिलाय. भाजप मतांसाठी काही करू शकते त्यांच्याकडे पैसा आहे. आधी जाती धर्मावर मत मागतात, नाही जमलं तर पैसे देऊन मत घेतात, म्हणून लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली. सरकारवर आफत आहे म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना आणली, अशी टीका भाजपवर बच्चू कडू यांनी केली आहे. भाजप पैश्याशिवाय उमेदवारी देत नाही. आमची सत्ता दिल्ली ते गल्ली असती तर एखादा रिक्षावाला महापौर केला असता.