मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशोत्सवाच्या तयारीदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. ‘भुलेश्वरचा राजा’ या २२ फूट उंच गणेशमूर्तीला भायखळ्याहून भुलेश्वरकडे नेत असताना रात्री सुमारे अकराच्या वाजता अचानक मूर्तीचा तोल गेला आणि ती रस्त्यावर कोसळली. मंडपापासून अवघ्या ५० ते ६० मीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. या घटनेत पाच जण जखमी झाले असून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.प्राथमिक माहितीनुसार, मूर्ती नेत असताना एका बाजूला कलंडल्याने हा अपघात झाला. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या रस्त्यावर कोणतेही मोठे खड्डे आढळून आले नाहीत. त्यामुळे मूर्तीचा तोल गेल्यानेच दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.