dannyy pandit hindu Muslim Reel : रिलस्टार डॅनी पंडित याने गणेशोत्सावर आधारित एक व्हिडिओ शेअर केली आहे. यामध्ये त्याने हिंदू मुस्लीम ऐक्यावर व्हिडिओ काढली असून हिंदू मुस्लीम ऐक्य दाखवले आहे.
पीएमपीएमएलकडून गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी बसेसच्या सेवेत बदल केला आहे. स्वारगेट आणि डेक्कन या बसथांब्याचे या दिवशी तात्पुरते पर्यायी जागेत स्थलांतर केले जाईल. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे स्वारगेट चौक, डेक्कन चौक…
ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नम... मोरया, मोरया... च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या…
गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक रात्री फिरतात. त्यांची सोय व्हावी म्हणून मेट्रो प्रशासनाने मेट्रो सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
वैभवशाली गणेशोत्सवाला प्रचंड गर्दी होत असते. राज्यासह देशभरातून भाविक येतात. पण, गर्दीत महिला-तरुणींची छेड काढण्याच्या घटनाही घडतात. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आगळी-वेगळी युक्ती राबवत छेडछाड काढणाऱ्यांचे फोटो फ्लेक्सद्वारे भरचौकात लावले…
यंदाचा गणेशोत्सव शनिवारी (दि. ७ सप्टेंबर) सुरू होत आहे. त्यामुळे कुंभार बांधवांची गणेशमूर्ती बनविण्यासाठी लगबग सुरू आहे. श्री गणेशाच्या आगमनाला आता अवघा एक महिना राहिल्याने कुंभारवाड्यात लगबग सुरू झाली आहे.
मानाचा पहिला गणपती असलेला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा वादक पथकाने केलेल्या शिस्तबद्ध वादनाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. हा जल्लोष पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक आज (गुरुवार) सायंकाळी ७ वाजता निघणार आहे. त्यासाठी यंदा आकर्षक ‘मयूरपंख रथ’ तयार करण्यात आला आहे.
गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन आलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरणार्या परराज्यातील टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांच्या टोळीकडून महागडे तब्बल २० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि... असे अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर, महिलांनी केलेला शंखनाद आणि मोरया मोरया च्या जयघोषाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात ३६ हजार महिलांनी सामुदायिकरित्या अथर्वशीर्षाचे…
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामधून मिरवणुकीला सुरुवात झाली असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते सकाळी १० वाजून ३० वाजता प्राणप्रतिष्ठापना झाली आहे.
सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतींची येत्या सोमवारी (दि १८) आणि मंगळवारी (दि १९) प्रतिष्ठापना होणार असून, यासाठी गणेश मूर्ती खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने शहरातील वाहतूकीत…
बहुतांश रस्त्यांवर खड्डे असल्याचे चित्र असून, खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. दरम्यान, साडेसात हजारांहून अधिक खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासाकडून करण्यात आला आहे.
वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवात राज्य, तसेच देशाच्या वेगवेगळ्या भागांतून भाविक येतात. उत्सवी गर्दीवर शहरातील १८०० सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहेत. पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना…
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी खरेदीची लगबग सुरू झाली आहे. पण यंदा मूर्तीसह सजावट साहित्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे महागाईच्या झळा गणेश भक्तांना सोसाव्या लागत आहेत.
गणेशोत्सव खरेदीसाठी मध्यभागात शनिवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. खरेदीसाठी शहर, तसेच उपनगरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मोठ्या संख्येने मध्यभागातील रस्त्यावर वाहने आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. गणेशोत्सवाचा प्रारंभ १९ सप्टेंबरपासून…