आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकरांचा जाहीरनामा काय असू शकतो आणि निवडणुकीत कोणते मुद्दे केंद्रस्थानी राहणार आहेत? वाढते प्रदूषण, रस्त्यांची दुरवस्था, सततचा वाहतुकीचा खोळंबा, गंभीर होत चाललेली पार्किंगची समस्या, तुंबलेली गटारे आणि अनेक भागांतील घाणीचं साम्राज्य—या सगळ्यांमुळे मुंबईकर त्रस्त आहेत. त्यातच आपल्या नागरी अधिकारांचा विसर पडत चालल्याची भावना अधिक गडद होत आहे. राजकारण भावनिक मुद्द्यांभोवती फिरत असताना, जनतेचे मूलभूत प्रश्न दुर्लक्षित तर होत नाहीत ना?