जनतेला पायाभूत सुख सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच दहशतवाद आणि नक्षलवाद संपवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीं करत आहेत, असं उच्चतंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केलं. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार सुधीर दादा गाडगीळ आणि ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे हे उपस्थित होते.राहुल गांधी आणि संजय राऊत म्हणजे फक्त प्रश्न उपस्थित करणारे आणि पळून जाणारे नेते आहेत, असं सांगून चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले, केवळ शंका उपस्थित करण्याशिवाय राहुल गांधी आणि संजय राऊत यांना दुसरे कोणतेही काम येत नाही, एकमेकांचे शिष्य आणि एकमेकांचे गुरु हे केवळ नकारात्मक टीका करण्यातच आपला वेळ घालवत आहेत, असं ही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी सांगितलं. सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच, राम मंदिराची उभारणी, पाकिस्तानला धडा शिकवणे हे महत्त्वाचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून 2047 पर्यंत भारतला आर्थिक दृष्ट्या महासत्ता करण्याचं उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आहे, असेही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी सांगितलं.