गोंदिया शहराला लागून असलेल्या बाजपेयी चौक परिसरात बनावटी दारुच्या कारखान्यावर गोंदिया पोलिसांनी धाड टाकत एका आरोपीला अटक केली आहे. गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बाजपेयी चौक परिसरातील एका घरात बनावटी दारू तयार करण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी धाड घालून बनावटी दारू गाळणारे द्रव्य तसेच स्पिरीट रसायन आणि इतर साहित्य असा एकूण 11 लक्ष रुपये असा मुद्देमाल जप्त केला आहे. तर एका आरोपीला देखील पोलिसांनी अटक केली असून पराग अग्रवाल असे त्या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन यात आणखी आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. घटनेचा पुढील तपास गोंदिया शहर पोलीस करत आहेत.