तुर्भेगाव येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त बांधवांनी नाहटा यांच्या प्रचार रॅलीत सहभागी होऊन नाहटा यांना पाठिंबा दर्शवला. स्थानिक प्रकल्पग्रस्त बांधवांचे नेते आतिष घरत यांनी भव्य प्रचार रॅलीचे आयोजन केले होते. तुर्भे गावच्या स्थानिक नागरिकांनी विजय नाहटा यांचा भव्य सत्कार केला व विजयासाठी पाठिंबा जाहीर केला.तसेच तुर्भे जनता मार्केट येथील व्यापाऱ्यांनी रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून नाहटा साहेबांचा सत्कार केला.तुर्भे सेक्टर 21 येथील मुस्लिम बांधवांनी रॅलीचे भव्य स्वागत केले व विजय नाहटा यांना संपूर्ण मुस्लिम समाजाचा जाहीर पाठिंबा घोषित केला. बेलापूर मतदार संघातून विजय नाहटा यांना जनतेचा वाढता पाठिंबा बघून विरोधकांना घाम फुटला आहे. भव्य प्रचार रॅलीत महिला भगिनी आणि तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाणण्या जोगा होता. तुर्भेस्टोर येथे इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजय नाहटा यांच्या रॅलीचे स्वागत केले आम्हीही सोबत असल्याची ग्वाही दिली.