वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या जालना येथील धनंजय काळे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. तात्काळ जालना ते पुणे ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. जालना शहरातील संजीवनी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमधून या भावी डॉक्टरचे अवयव संकलित करून ते पुणे येथील दोन हॉस्पिटल आणि छत्रपती संभाजी नगर येथील दोन हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. कुटुंबीयांच्या या निर्णयामुळे सहा रुग्णांचे प्राण वाचले आहेत.