जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एकलवापर प्लास्टिकच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक पर्यावरण विभागाच्या वतीने प्लास्टिकविरोधी रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकातून सुरू होऊन महानगरपालिका मुख्यालयाजवळ समाप्त झाली. या रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन आणि घोषणा देत नागरिकांना प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले. पर्यावरण रक्षणासाठी एकलवापर प्लास्टिक टाळणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.