कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार असतानाच केडीएमसीतील मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला आहे. अनेक प्रभागांतील हजारो मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन मतदार यादीतील सर्व त्रुटी तात्काळ दुरुस्त कराव्यात, सुधारित मतदार यादी प्रसिद्ध करावी तसेच यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.