कल्याण पूर्वेतील अर्णव खैरे या युवकाच्या मृत्यू प्रकरणाला अनाठायीपणे राजकीय वळण देत ठाकरे बंधूंवर बेसुमार आरोप करणाऱ्या भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण पूर्व विभागप्रमुख किरण निचळ आणि विधानसभा प्रमुख नारायण पाटील यांनी केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत गुरव यांना सादर केले.