लोकलच्या गर्दीने बारावीची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या सोहम कठरेचा जीव घेतला. या दुर्दैवी घटनेनंतर जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे. लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी समांतर रस्त्याचे काम लवकर सुरु व्हायला पाहिजे अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी केली आहे. केडीएमटीने डोंबिवली ते ठाणे बस सेवा सुरु करावी, कल्याण ते मुंबई आणि डोंबिवली ते ठाणे फास्ट लोकलफेऱ्या वाढवाव्यात अशा मागण्या येत्या विधानसभा अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.