जळगाव जिल्ह्यात शिंदे शिवसेनेचे सहा नगराध्यक्ष निवडून आले आहेत, त्यापैकी पाच नगराध्यक्ष भाजपचा पराभव करून निवडून आले आहेत. जिल्ह्यात भाजपसोबत न जाता सर्वच ठिकाणी स्वतंत्र लढलो असतो तर आमच्या नगराध्यक्षांची संख्या आणखी वाढली असती अशी प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेनेचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली आहे. जळगाव जिल्ह्यात शिंदे शिवसेनेचे एकूण सहा नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यापैकी पाच नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचा पराभव करून निवडून आले आहेत. जिल्ह्यात धरणगाव, नशिराबाद, एरंडोल व पारोळा या ठिकाणी शिंदे शिवसेना व भाजपची युती झाली होती. मात्र या ठिकाणी युती न करता जर स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती तर नगराध्यक्षांची संख्या आणखी वाढली असती असे किशोर पाटील यांनी सांगितले.