दि. 29 तारीखपासून नांदेडमध्ये माळेगाव यात्रेला सुरुवात होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्यानिमित्त जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शंभरहून अधिक स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना बी बियाण्यांची माहिती तसेच आधुनिक पद्धतीने शेती करण्याची पद्धत व मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून 100 स्टॉल लावण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या विविध स्पर्धा घेऊन शेतकऱ्यांना सपत्नीक पुरस्कार देण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा परिषद कृषी अधिकारी निलकुमार पाटील यांनी दिली आहे.