Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माळेगावमधील प्रभाग नऊमध्ये विकासकामांना प्रारंभ; ‘विशिष्ट नागरी सेवा व सुविधा’ योजनेअंतर्गत होणार विविध कामे

माळेगाव येथील नागरी स्थानिक स्वराज्य परिक्षेत्रात अधिसूचित ‘विशिष्ट नागरी सेवा व सुविधा’ योजनेअंतर्गत विविध कामांचा शुभारंभ उत्साहात पार पडला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 15, 2026 | 03:57 PM
माळेगावमधील प्रभाग नऊमध्ये विकासकामांना प्रारंभ; ‘विशिष्ट नागरी सेवा व सुविधा’ योजनेअंतर्गत होणार विविध कामे

माळेगावमधील प्रभाग नऊमध्ये विकासकामांना प्रारंभ; ‘विशिष्ट नागरी सेवा व सुविधा’ योजनेअंतर्गत होणार विविध कामे

Follow Us
Follow Us:
  • माळेगावमधील प्रभाग नऊमध्ये विकासकामांना प्रारंभ
  • ‘विशिष्ट नागरी सेवा व सुविधा’ योजनेअंतर्गत होणार विविध कामे
  • आदर्श नगरपंचायत उभारण्याचा निर्धार
माळेगाव : पुणे जिल्ह्यातील माळेगाव येथील नागरी स्थानिक स्वराज्य परिक्षेत्रात अधिसूचित ‘विशिष्ट नागरी सेवा व सुविधा’ योजनेअंतर्गत स्ट्रीट लाईट पोल बसविणे तसेच नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा बळकटीकरण व विस्तारीकरण योजनेतून विविध ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकण्याच्या कामांचा शुभारंभ उत्साहात पार पडला. प्रभाग क्रमांक ९ मधील संभाजीनगर व चव्हाण वस्ती येथून या विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास माळेगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष सुयोग सातपुते, नगरसेवक ॲड. राहुल तावरे, वैभव खंडाळे व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत भूमिपूजन करून कामांना सुरुवात करण्यात आली.

 

या उपक्रमांतर्गत रस्त्यांवर नवीन स्ट्रीट लाईट पोल बसविल्यामुळे परिसर अधिक प्रकाशमान होणार असून, सुरक्षिततेत लक्षणीय वाढ होणार आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांची व महिलांची सुरक्षित हालचाल सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच नव्या जलवाहिन्यांमुळे पाणीपुरवठा अधिक सुरळीत, दाबयुक्त व नियमित होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन आदर्श नगरपंचायत उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

हे सुद्धा वाचा : दुःखावर मात करून सुनेत्रा पवारांचा निर्णायक पुढाकार; बारामतीत जनता दरबारातून विकासाला नवी गती

मुलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न

नगरसेवक ॲड. राहुल तावरे यांनी, “मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील. नागरिकांच्या दैनंदिन गरजांना प्राधान्य देत प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,” असे सांगितले. याप्रसंगी रवींद्र बडदे, सुनील माळवदकर, रमेश तावरे, सोनू जाधव, अमित तावरे, आदित्य खोटे, सागर फरतडे, सुनील जाधव, सुरेश जराड, रवींद्र सुतार, संग्राम तावरे, नितीन तावरे, चेतन तावरे व दिलीप तावरे उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ९ मधील रहिवाशांनी या विकासकामांचे स्वागत करत समाधान व्यक्त केले असून, पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Web Title: Development works have started in ward number nine in malegaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Malegaon
  • NCP News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.