नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कार्ला एकवीरा गडावर आई एकविरेच्या दर्शनासाठी मंदिर भाविकांच्या श्रद्धेने फुलून गेले आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या लांबच लांब रांगा मंदिर परिसरात पाहायला मिळत आहेत. नवीन वर्षाची सुरुवात आई एकवीरेच्या चरणी व्हावी, सुख-समृद्धी लाभावी या भावनेतून राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. एकवीरेंचा जयघोष, भक्तीभाव आणि श्रद्धेच्या वातावरणाने संपूर्ण मंदिर परिसर भारावून गेला आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले असून, भाविक शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. श्रद्धा, भक्ती आणि नववर्षाच्या आशेने लोणावळ्यातील एकवीरा देवी मंदिरात भक्तीचा उत्सव साजरा होत आहे.