अमरावतीत विद्यार्थीनींसोबत खासदार नवनीत राणा थिरकल्या
अमरावती येथे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी द्वारा आयोजित वार्षिक सांस्कृतिक संमेलन व खेळ उत्सवमध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी विद्यार्थीनी सोबत नृत्य केले. नवनीत राणा या राजकारणात येण्यापूर्वी अभिनेत्री होत्या. त्यामुळे ज्या ठिकाणी वेळ आली त्या ठिकाणी त्या मनसोक्त नृत्य करत आपला आनंद व्यक्त करत असतात.