नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांवरच गंभीर आरोप केले आहेत. नवनाथ बन यांचे महत्त्वाचे मुद्दे: 1) थेट आरोप: खरात प्रकरणात राऊतांनी ‘दलाली’ केल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी भोंदू बाबाला का दिलं, असा सवाल विचारला आहे. 2) सहआरोपी कोण?: जर मंत्र्यांना सहआरोपी करण्याची मागणी राऊत करत असतील, तर मग याच बाबासाठी रेड कार्पेट अंथरणारे उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनाही आरोपी करायचं का? 3) गॅस टंचाईची अफवा: राज्यात कोणतीही गॅस टंचाई नाही. राऊत जाणीवपूर्वक जनतेमध्ये घबराट (Panic) निर्माण करत असून त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही. 4) SIT चौकशी: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची सखोल SIT चौकशी सुरू असून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे दिवस आता संपले आहेत. संजय राऊतांच्या प्रत्येक आरोपाचा नवनाथ बन यांनी खरपूस समाचार घेतला असून, आगामी काळात हे वाकयुद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.