नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे सांगितले. त्यांचा दावा आहे की काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव आहे, स्थानिक आणि जिल्हा पातळीवर नेत्यांमध्ये संवाद नाही. त्यामुळे काँग्रेसमधील कार्यकर्त्यांची अडचण होते आणि मजबूत भाजपमध्ये कार्य करायची इच्छा निर्माण होते. हेच कारण कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणातील पक्षप्रवेशामागे असल्याचे बावनकुळेंनी स्पष्ट केला. तसेच, भाजपमध्ये कार्यकर्त्यांना मोकळीक मिळते आणि त्यांच्या तक्रारी थेट नेत्यांपर्यंत पोहोचतात, अशी बाबही त्यांनी अधोरेखित केली आहे.