VIDEO | २२ एप्रिलपर्यंत जे कर्मचारी कामावर रुजू होतील त्यांच्यावर कारवाई नाही – परब
मागील पाच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरणासाठी आंदोलन सुरू आहे, दरम्यान याआधी राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना सात वेळा अल्टिमेटम दिला होता आणि कामावर रुजू होण्यास सांगितले होते. तरीसुद्धा काही कर्मचारी संपावर ठाम आहेत. आज उच्च न्यायालयात त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावर सुनावणी देताना न्यायालयाने म्हटले आहे की. 22 एप्रिल पर्यंत एसटी कर्मचाऱ्याने कामावर रुजू व्हावे व जे कर्मचारी कामावर रुजू होते त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे आदेश न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत.