गॅस दरवाढीच्या निषेधार्थ पनवेलमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. प्रतीकात्मक गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढत आंदोलकांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.