पाथरी शहरातील हनुमान नगर येथील दहा हजार स्क्वेअर जगा तिची अंदाजे किंमत एक कोटी रुपये, या ठिकाणी अतिक्रमण करून बांधकाम केल्याप्रकरनी साईबाबा मंदिर रोडवरील हमीद टॉवरचे बांधकाम अतिक्रमण करून केली असल्याने राज्याच्या नगरविकास विभागाने या प्रकरणी दखल घेतली आहे. तर पाथरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांनी या प्रकरणी नगरपरिषदेचे स्वीकृत सदस्य तथा 17 वर्षे आमदार राहिलेले आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांना नोटीस बजावली आहे. सदरील बांधकाम हे अनाधिकृत असून ते 30 दिवसांमध्ये स्वखर्चातून पाडावे अन्यथा नगरपालिका हे बांधकाम पाटील आणि त्याचा खर्च बाबाजानी दुर्राणी आणि त्यांच्या कुटुंबाकडून वसूल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. तर त्यांचे स्वीकृत नगरसेवक पद रद्द करण्यात येऊ नये याबाबत खुलासा सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आली आहेत. तर दुसरीकडे बाबाजानी दुरानी यांनी मोठ्या प्रमाणात या दोन्ही प्रकरणात अनियमित्ता केल्या असून ते व त्यांचे नातेवाईक या प्रकरणी जेलमध्ये जातील असा खळबळ जनक दावा शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी केला आहे. परभणीच्या राजकारणातील मातब्बर नेते बाबाजानी दुर्राणी यांना अशी नोटीस बजावण्यात आली असल्याने परभणी मध्ये एकच खळबळ उडाली आहे.