कासार्डे गावातील अवैध सिलिका वाळू उत्खननातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. हजारो हेक्टर जमीनीत सिलिकाचे उत्खनन करून १०० ते २०० फूटापर्यंत खोल जमीन खोदून पर्यावरणाचा देखील ऱ्हास केला जात आहे. त्याबाबत वारंवार तक्रार करून आणि निवेदने देऊनही प्रांताधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. आर्थिक देवाण घेवाणीसाठी अथवा कोणाच्यातरी दबावाखाली प्रांताधिकारी व तहसीलदार वाळूमाफियांना शासनाचा महसूल बुडविण्याची मुभा देत आहेत असा आरोप केला आहे.