छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल येथील राजवाड्यात छत्रपती संभाजी आणि शाहू महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला छत्रपती उदयनराजे भोसले यांची चुलत बहीण छत्रपती वृषाली राजे भोसले यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांनी छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून ज्या ठिकाणी प्रतापसिंह महाराजांचे वास्तव्य असणारा राजवाडा हा पूर्वीच्या काळात ज्याप्रमाणे होता त्या प्रमाणे सजवला होता याची त्यांनी पाहणी केली. या वाड्यातच छत्रपतींच्या राजघराण्यातील काही दुर्मिळ फोटो तसेच 1800 शतकातील सातारा शहराचे दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. याला देखील त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी “साताऱ्यातील हा जुना राजवाडा छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या जीवनावर आधारित असून याचे जतन आणि संवर्धन होण्याची गरज आहे. छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी सातारा शहर महाबळेश्वर वसवले असून याची सर्वांना माहिती होणे गरजेचे आहे यासाठी या राजवाड्यात शासनाने छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य संग्रहालय उभे करावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. यावेळी छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव समितीचे सदस्य आणि सातारकर उपस्थित होते.